घरदेश-विदेशधक्कादायक! अमेरिकेत भारतीय पती-पत्नीचा संशयास्पद मृत्यू

धक्कादायक! अमेरिकेत भारतीय पती-पत्नीचा संशयास्पद मृत्यू

Subscribe

अमेरिकेतील न्यूजर्सीमध्ये एका भारतीय दाम्पत्यांचा संशयास्पद मृत्यू झाला असून ही हत्या आहे की आत्महत्या याचा उलगला अद्याप होऊ शकलेला नाही. गरिमा कोठारी या ३५ वर्षीय गरोदर महिलेचा मृतदेह तिच्या राहत्या घरामध्ये आढळला असून पतीचा मृतदेह जवळील हडसन या नदीत सापडला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलीस या गुंतागुंतीच्या घटनेचा सखोल तपास करत आहेत. हडसन काउंटीच्या अधिकृत माहितीनुसार न्यूजर्सी सिटी पोलिसांना २६ एप्रिल रोजी गरिमा कोठारी यांचा मृतदेह आढळला. त्यांच्या शरिरावर वरवर पाहता कोणतीही जखम नव्हती. मात्र शवविच्छेदन अहवालात त्यांच्या मृत्यूच कारण हत्या सांगण्यात आले आहे. गरिमा पती मनमोहन (वय ३७) यांचा मृतदेह हडसन नदी सापडला. मात्र त्यांच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

गरिमा कोठारी

पत्नीची हत्या मात्र पतीचा मृत्यू अस्पष्ट 

आत्महत्येची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मिळालेल्या माहितीनुसार, गरिमा एक नामवंत शेफ होती. तर मनमोहन हे इंडियन इंस्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी) मधून पदवीधर होते. दोघही कोलंबिया युनिव्हर्सिटीतून मास्टर्सची डिग्री घेण्याकरता अमेरिकेत आले होते. हे दाम्पत्य न्यूजर्सी शहरातील एका अपार्टमेंटमध्ये राहत होते.

- Advertisement -

हेही वाचा –

मुबंईत सैन्याला पाचारण करता येणार नाही; हायकोर्टाने फेटाळली याचिका

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -