घरCORONA UPDATEतीन भावांनी घेतला स्पायडरमॅन बनण्याचा ध्यास; केले 'हे' विचित्र कृत्य

तीन भावांनी घेतला स्पायडरमॅन बनण्याचा ध्यास; केले ‘हे’ विचित्र कृत्य

Subscribe

हॉलीवूडमधील लोकप्रिय चित्रपट स्पायडर मॅनचे अनेक चाहते आहेत. हा चित्रपट पाहून अनेकांना आपणही सुपरहिरो बनावे, असे वाटू लागले. नुकतेच बोल्विया येथील तीन मुलांनी स्पायडर मॅन बनण्याचा ध्यास घेतला. त्यासाठी या मुलांनी जे केले ते अचंबित करणारे होते. साधारण ८, १० आणि १२ वर्ष वयाच्या तीन भावंडांनी स्पायडर मॅन बनण्याचा ध्यास घेतला. त्यासाठी या मुलांनी विष असलेल्या कोळी किड्यापासून स्वतः डंक मारून घेतला. या मुलांचे हे खेळ सुरू असताना त्यांची आई लाकड गोळा करण्याच्या कामात गुंतली होती. स्पायडर मॅन बनण्यासाठी आणि त्याच्यासारखी ताकद मिळवण्यासाठी असे करणे या मुलांना गरजेचे वाटले. त्यामुळे मुलांनी स्वतःला डंक मारून घेण्याचे प्रताप केले.

हेही वाचा – श्रमिक ट्रेनमध्ये बाळाचा जन्म; आईने मानले रेल्वेचे आभार

- Advertisement -

काय आहे प्रकरण

त्या मुलांनी एका विषारी कोळी किड्याला लाकडाच्या सहाय्याने उचलून आपल्या शरिरावर ठेवले. थोड्यावेळाने कोळीने त्यांना डंक मारला. किड्यातील विष मुलांच्या शरिरात पसरू लागले. तिनही मुलांचे शरीर आखडले, अंगावर सूज आली, त्यांना ताप येऊ लागला. मुलांची आई जेव्हा घरी पोहोचली तेव्हा मुलं रडताना, ओरडताना तिला दिसली. आईने त्वरीत तिनही मुलांना जवळच्या हॉस्पिटलमध्ये नेले. तयंता हेल्थ सेंटरमध्ये या तीन मुलांवर उपचार करणारे डॉक्टरसुद्धा मुलांचा हा प्रताप पाहून आश्चर्यचकीत झाले आहेत. मुलांच्या शरिरात विष खुपच पसरले होते. तिघांनाही बोल्वियाची राजधानी ला पाझ येथील चाईल्ड हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. काही दिवस तिथे त्यांच्यावर उपचार केल्यानंतर त्यांच्या तब्येतीत सुधारणा झाली. अखेर पाच दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर त्यांना बरे झाल्यावर घरी पाठवण्यात आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -