घरताज्या घडामोडीश्रमिक ट्रेनमध्ये बाळाचा जन्म; आईने मानले रेल्वेचे आभार

श्रमिक ट्रेनमध्ये बाळाचा जन्म; आईने मानले रेल्वेचे आभार

Subscribe

सुरत रेल्वे स्थानकातून जाणाऱ्या श्रमिक स्पेशल ट्रेनमध्ये एका महिलेने गोड बाळाला जन्म दिला आहे.

सुरत रेल्वे स्थानकातून जाणाऱ्या श्रमिक स्पेशल ट्रेनमध्ये एका महिलेने गोड बाळाला जन्म दिला आहे. या महिनेने रेल्वे प्रवाशांचे आभार मानले असून आई आणि बाळ दोघेही सुरक्षित आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी ट्रेन क्रमांक ०९६३७ श्रमिक स्पेशल ट्रेन सुरतवरून प्रतापगढकडे जात होती. या श्रमिक स्पेशल ट्रेनमध्ये २८ वर्षीय पूजा देवी आणि तिचे पती आंनद कुमार आपल्या सहकुटूंबियांबरोबर प्रवास करत होते. दरम्यान, पूजा गरोदर होती. मात्र, अशा अवस्थेत देखील त्यांना आपल्या घरी जायचे होते. श्रमिक ट्रेनच्या इंजिनपासून चौथ्या डब्यातून हे प्रवासी प्रवास करत होते. प्रवासादरम्यान पूजाला अचानक प्रसूतीच्या कळा येऊ लागल्या. त्यानंतर सह प्रवाशांनी याची माहिती ट्विटर वरून रेल्वे प्रशासनाला दिली. त्यानुसार रेल्वे प्रशासनाला माहिती मिळताच पश्चिम रेल्वेच्या रतलाम विभागाने आरोग्य विभागाला कळवली. तसेच रतलाम रेल्वे स्टेशनवर श्रमिक ट्रेन येण्याआगोदरच रेल्वेच्या आरोग्य विभागाच्या डॉक्टरांची टिम आणि रुग्णवाहिका तयार होती. रेल्वे स्थानकावर गाडी सकाळी ९ वाजून ७ मिनिटांनी येताच रेल्वेचे डॉक्टर अंकिता मेहता आणि त्याच्या टीमने रेल्वे डब्यात प्रवेश केला आणि महिलेची सुखरूप प्रस्तुती केली.

- Advertisement -

त्यानंतर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून महिलेला रुग्णवाहिकेतून जिल्हा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. पूजाने एका गोड मुलाला जन्म दिला आहे. तो एकदम सुखरूप आहे, अशी माहिती पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. त्यानंतर श्रमिक ट्रेन सकाळी ९ वाजून ४३ मिनिटांनी पुढच्या प्रवासाला निघाली.

कुटुंबियांने मानले आभार

दरम्यान, रतनला रेल्वे स्थानकावर डॉक्टरांनी बोगीत प्रवेश केला. त्यानंतर पूजाला त्रास होत असल्याने महिलेने रुग्णालयात जाण्यास नकार दिल्यानंतर डॉक्टरांनी सहाय्यक कर्मचार्‍यांसह रेल्वेच्या बोगीतच महिलेची सुरक्षित प्रसूती केली. यावेळी महिलेने एका मुलाला जन्म दिला. नवजात मुलाचा आवाज ऐकू येताच बोगीमध्ये उपस्थित प्रवाशांनी टाळ्या वाजवण्यास सुरूवात करून जल्लोष केला. तसेच पश्चिम रेल्वेचे आभार सुद्धा मानले आहेत. पूजाचे पती आंनद कुमार यांनी दैनिक ‘आपलं महानर’शी बोलताना सांगितले कि, पूजाला होत असलेल्या त्रासामुळे मी खूप घाबरलो होतो. मात्र, सहप्रवासी आणि पश्चिम रेल्वेकडून तात्काळ मदत मिळाल्याने बाळ आणि पूजा सुखरूप आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – सिंधुदुर्गात क्वारंटाईन असलेल्या तरुणाला श्वास घेण्यास त्रास; उपचारासाठी नेताना वाटेतच मृत्यू


 

Nitin Binekar
Nitin Binekarhttps://www.mymahanagar.com/author/bnitin/
गेल्या ५ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सार्वजनिक वाहतूक, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -