घरदेश-विदेशभारतीय वंशाच्या कर्मचाऱ्याने Apple ला घातला तब्बल १३८ कोटी रुपयांचा गंडा

भारतीय वंशाच्या कर्मचाऱ्याने Apple ला घातला तब्बल १३८ कोटी रुपयांचा गंडा

Subscribe

नवी दिल्ली : ऍपलच्या (Apple) एका भारतीय वंशाच्या माजी कर्मचाऱ्याने कंपनीची तब्बल 1.7 दशलक्ष डॉलर्स म्हणजे सुमारे 138 कोटी रुपयांची फसवणूक केली आहे. धीरेंद्र प्रसाद (Dhirendra Prasad) या कर्मचाऱ्यावर मार्च 2022 मध्ये कंपनीची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला होता. याप्रकरणी गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये ऍपल कंपनीची फसवणूक आणि कर फसवणूक केल्याप्रकरणी तो दोषी आढळून आला होता. याप्रकरणी त्याला तीन वर्षांची शिक्षा झाली असून कंपनीला $19 म्हणजे सुमारे 155 कोटी रुपये दंड भरावा लागणार आहे. (An ex-employee of Indian origin defrauded Apple of Rs 138 crore)

धीरेंद्र प्रसाद हा 55 वर्षीय व्यक्ती ऍपलच्या जागतिक पुरवठा साखळीत खरेदीदार म्हणून 2008 ते 2018 दरम्यान काम करत होता. विक्रेत्याकडून फोनचे भाग खरेदी करण्यापासून इतर अनेक कामांची जबाबदारी त्याच्यावर होती. हा कर्मचारी ऍपल कंपनीच्या उत्पादनांची जुनी उपकरणे जी वॉरंटीमध्ये आहेत ती खरेदी करत होता. या कामासाठी त्याने दोन कंपन्यांशी करार केला होता. या कंपन्यांकडून नवीन किमतीत जुनी उत्पादने खरेदी करून हा नफा कमावत होता.

- Advertisement -

त्याने कंपनीची फसवणूक, पार्ट्स चोरणे, चलन वाढवून दाखवने आणि कधीही न वितरीत केलेल्या वस्तूंसाठी ऍपलकडून पैसे घेतल्याचे मान्य केले आहे. एवढेच नाही तर त्याने ऍपलसारख्या मोठ्या कंपनीची फसवणूक केलेल्या पैशावर कधीही कर भरला नाही. त्याला या फसवणूकीत मदत करणाऱ्या दोन विक्रेत्या कंपन्यांच्या मालकांवरही गुन्हे दाखल करण्यात आल्याचे समोर आले आहे.

स्वत:ला फायदा पोहचवण्यासाठी अधिकाराचा गैरवापर
यूएस डिपार्टमेंट ऑफ जस्टिस (USDJ) ने म्हटले की, कर्मचाऱ्याने खरेदीदार म्हणून ऍपल कंपनीची फसवणूक केली आणि कंपनीच्या अंतर्गत माहितीच्या आधारे त्याने आपल्या गुन्हेगारी कारवाया लपविण्याचा प्रयत्न केला आहे. ऍपलमधील कर्मचाऱ्याच्या पदामुळे त्याला कंपनीच्या फायद्यासाठी स्वतःहून निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य देण्यात आले होते, परंतु त्याने कंपनीचा विश्वासघात केला आहे आणि त्याने कंपनीच्या पैशाचा स्वत:ला फायदा पोहचवण्यासाठी आपल्या अधिकाराचा गैरवापर केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -