घरदेश-विदेशतिरुपती तिरुमाला देवस्थानच्या १४ पुजाऱ्यांना कोरोनाची लागण

तिरुपती तिरुमाला देवस्थानच्या १४ पुजाऱ्यांना कोरोनाची लागण

Subscribe

तिरुपती देवस्थानाचे कार्यकारी अधिकारी अनिल कुमार सिंघल यांनी आज मंदिरातील पुजारी, आरोग्य आणि दक्षता अधिकाऱ्यांसह घेतली तातडीची बैठक

आंध्र प्रदेशात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असल्याने आंध्र प्रदेशात कोरोना रूग्णांची संख्याही वाढत आहे. मात्र आंध्र प्रदेशातील तिरुमाला तिरुपती देवस्थानमधील १४ पुजाऱ्यांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचे समोर आले आहे. तिरुपती देवस्थानाचे कार्यकारी अधिकारी अनिल कुमार सिंघल यांनी आज मंदिरातील पुजारी, आरोग्य आणि दक्षता अधिकाऱ्यांसह बैठक घेतली. या बैठकीत कोरोना विषाणूंविरूद्ध लढण्याच्या उपायांवरही चर्चा करण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, तिरुपती तिरुमाला देवस्थानममधील सुमारे ५० पैकी १४ पुजारी पॉझिटिव्ह आढळले आहेत तर उर्वरित काही जणांच्या कोरोना रिपोर्टची सध्या प्रतीक्षा आहे. आतापर्यंत, साधारण ९० तिरुपती तिरुमाला देवस्थानातील स्टाफ सदस्यांनी कोरोना व्हायरसची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. १० जुलै पर्यंत तिरुमला येथे १ हजार ८६५ तिरुपती तिरुमाला देवस्थानम कर्मचार्‍यांसाठी कोरोना चाचणी घेण्यात आली आहे. तर आतापर्यंत अलीरी येथील तिरुपती तिरुमाला देवस्थानम कर्मचार्‍यांसाठी १ हजार ७०४ आणि ६३१ भाविकांच्या कोरोना चाचण्या घेण्यात आल्या आहेत.

- Advertisement -

दरम्यान, १२ जुलै रोजी तिरुपती तिरुमाला देवस्थानचे कार्यकारी अधिकारी अनिल कुमार सिंघल यांनी भाविक आणि माध्यमांशी बैठक घेऊन ९१ तिरुपती तिरुमाला देवस्थानच्या संसर्गाची माहिती दिली होती. चित्तूर जिल्हा वैद्यकीय व आरोग्य अधिकारी (डीएमएचओ) डॉ. Penchalaiah म्हणाले की, साधारण ३ हजार यात्रेकरू भाविकांची कोरोना चाचणी करण्यात आली होती, यामध्ये आतापर्यंत आलेले सर्व कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत.

- Advertisement -

तसेच, अशीही माहिती मिळाली आहे की तिरुपती तिरुमाला देवस्थान स्टाफ आणि वर्कर्स युनायटेड फ्रंटवेच्या प्रतिनिधींनी तिरुपती तिरुमाला देवस्थानाच्या कार्यकारी अधिकाऱ्यांना पत्र लिहून मंदिराचे दर्शन तात्पुरते स्थगित करण्याची विनंती देखील केली.


COVID-19 Alert: ‘हे’ आहेत कोरोनाचे ११ लक्षणं; जाणून घ्या, कोणते आहेत धोकादायक
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -