घरदेश-विदेशकुलभूषण जाधव यांना दुसर्‍या समुपदेशक प्रवेशासाठी मान्यता

कुलभूषण जाधव यांना दुसर्‍या समुपदेशक प्रवेशासाठी मान्यता

Subscribe

पाकिस्तानने आज, गुरुवारी भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांना समुपदेशक प्रवेश दिला आहे. दोन भारतीय अधिकारी सध्या पाकिस्तानी परराष्ट्र कार्यालयात आहेत, अशी माहिती एएनआयया वृत्तसंस्थेने पाकिस्तानी मीडियाच्या हवाल्याने दिली आहे. यापूर्वी पाकिस्तानने दावा केला होता की भारतीय कुलभूषण जाधव शिक्षेची समीक्षा याचिका दाखल करण्यात नकार दिला आहे. मात्र भारताने पाकिस्तानच्या या दाव्याचा खोटे ठरवले.

दरम्यान, पाकिस्तानने इराणमधून अपहरण केलेले आणि सध्या पाकिस्तानी कैदेत असलेले भारतीय नागरिक आणि माजी भारतीय नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांना विनाशर्त Consular Access द्या, अशी मागणी भारताने पुन्हा एकदा पाकिस्तानकडे केली होती. इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिसच्या रिव्ह्यू पिटीशन दाखल करण्याआधी सुद्धा भारताने ही मागणी लावून धरली होती. आयसीजेच्या अनुसार Consular Access आणि स्वतंत्र निपक्ष पद्धतीने ट्रायल व्हायला पाहिजे. या निवेदनानंतर आता कुलभूषण जाधव यांना समुपदेशक देण्यात आला आहे.

- Advertisement -

पाकिस्तानमधील लष्कर कोर्टाने एप्रिल २०१७ ला कुलभूषण जाधव यांना गुप्तहेर आणि दहशतवादी असल्याचा आरोप करत मृत्यूची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर काही आठवड्यांनी भारताने जाधव यांच्यापर्यंत दुतावास पोहोचू न दिल्याने तसेच त्यांना सुनावण्यात आलेल्या फाशीच्या शिक्षेवरून पाकिस्तानविरोधात आंतरराष्ट्रीय कोर्टात (आयसीजे) मध्ये याचिका दाखल केली. आयसीजेने तेव्हा पाकिस्तान कोर्टाने दिलेल्या निर्णयावर स्थगिती आणली.

- Advertisement -

हेही वाचा –

Good News: देशात कोरोनावर दुसऱ्या लसीची मानवी चाचणी सुरु

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -