घरदेश-विदेशकोरोना संसर्गामध्ये फायदेशीर ठरतंय 'हे' अँटी डिप्रेशन औषध!

कोरोना संसर्गामध्ये फायदेशीर ठरतंय ‘हे’ अँटी डिप्रेशन औषध!

Subscribe

गेल्या दीड वर्षांपासून देशात कोरोनाचा कहर अद्याप सुरू असून कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होण्यासाठी वेगाने कोरोना लसीकरण मोहिम सुरू आहे. संपूर्ण वर्ष उलटून गेल्यानंतरही जगभरातील शास्त्रज्ञ अजूनही कोरोना व्हायरस आणि त्याच्या नव्या लक्षणांसह संबंधित समस्या जाणून घेण्याचा अभ्यास करीत आहेत. यासोबतच या धोकादायक विषाणूचा सामना करण्यासाठी अधिक प्रभावी औषधांच्या शोधात संशोधन केले जात आहे.

दरम्यान, संशोधकांनी एक सामान्य अँटी डिप्रेशन औषधात आशेचा किरण पाहिला आहे, जो कोरोना संसर्गाचा सामना करण्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. संशोधकांनी केलेल्या या अभ्यासात असा दावा करण्यात आला आहे की, फ्लुओक्सामाइन (fluvoxamine) नावाच्या औषधाच्या वापराने कोरोना संसर्ग लवकर नियंत्रित केला जाऊ शकतो. यामुळे रुग्णाला रुग्णालयातून लवकर डिस्चार्ज देखील दिला जाऊ शकतो असे सांगितले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, करण्यात आलेलं संशोधन हे अमेरिका, कॅनडा आणि ब्राझीलमधील संशोधकांच्या आंतरराष्ट्रीय संघाकडून करण्यात आले आहे. या अभ्यासात १ हजार ४७२ रुग्णांपैकी काहींना फ्लुओक्सामाइन (fluvoxamine) नावाचं औषध दिले गेले. या लोकांमध्ये ५० वर्षांपेक्षा जास्त वयाचे आणि ज्यांना कोरोनाचा गंभीर संसर्ग होण्याचा उच्च धोका होता अशांचा समावेश होता.

- Advertisement -

संशोधकांनी दिलेल्या माहितीनुसार, या अभ्यासाचा परिणाम कोरोनाच्या उपचारांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलू शकतात. हे औषध जगभरात उपलब्ध असून फायदेशीर देखील आहे. या अभ्यासाशी संबंधित असणारे आणि कॅनडाच्या मॅकमास्टर विद्यापीठाचे प्राध्यापक एडवर्ड मिल्स यांनी सांगितले की, ‘सध्या कोरोना वरील उपचारांबाबत मर्यादित पर्याय उपलब्ध आहेत. तसा हा अभ्यास दिलासादायक आहे. या औषधासह कोरोनाच्या प्रत्येक उपचाराची किंमत फक्त ३०० रुपये असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे कोरोनाविरुद्धच्या लढाईत हे औषध महत्त्वाचे ठरू शकते.


Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -