घरदेश-विदेश'राहुल गांधी देशाला आपली मालमत्ता समजतात!'

‘राहुल गांधी देशाला आपली मालमत्ता समजतात!’

Subscribe

वायनाडचे खासदार आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केलेल्या टीकेवर आता भाजपकडून जोरदार प्रतिहल्ला केला जात आहे. राहुल गांधींनी मोदींवर टीका करणारं ट्वीट करून म्हटलं होतं की, ‘मोदींना वाटतं जग त्यांच्यासारखं आहे. त्यांना वाटतं की प्रत्येकाची एक किंमत असते आणि कुणालाही धमकावता येऊ शकतं. पण त्यांना हे माहीत नाही की जी लोकं सत्यासाठी लढत असतात, त्यांची काहीही किंमत नसते आणि ते कुणाच्या धमक्यांनाही घाबरत नाहीत’. राहुल गांधींच्या या ट्वीटनंतर भाजपकडून तीव्र आक्षेप घेतला जात आहे. त्यानंतर आता चित्रपट दिग्दर्शक अशोक पंडित यांनी देखील राहुल गांधींवर टीका केली आहे.

काय म्हणाले अशोक पंडित?

अशोक पंडित यांनी राहुल गांधींवर टीका करताना म्हटलं आहे, ‘राहुल गांधी आणि त्यांच्यां कुटुंबाला वाटतंय की भारत त्यांची वैयक्तिक संपत्ती आहे आणि इतर भारतीय हे त्यांचे सर्व्हंट आहेत. पण २०१४मध्ये सोनिया गांधी आणि राहुल गांधी या मायलेकाचा हा गैरसमज दूर झाला होता. पुन्हा २०१४मध्ये देखील हेच झालं. पुढे देखील हेच होणार आहे’.

- Advertisement -

गेल्या काही दिवसांपासून राहुल गांधी आणि एकूणच काँग्रेसकडून सत्ताधारी भाजप आणि विशेषत: पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका सुरू केली आहे. त्यातच केंद्र सरकारने राजीव गांधी फाऊंडेशनला चीनकडून मिळालेल्या कथित फंडिंगवर आक्षेप घेत त्याची चौकशी सुरू केली आहे. त्यामुळे काँग्रेसकडून केल्या जाणाऱ्या टीकेची धार अधिकच वाढली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -