Monday, April 12, 2021
27 C
Mumbai
घर देश-विदेश Assam Election 2021: भाजप उमेदवाराच्या गाडीत EVM मशीन; प्रियंका गांधींची भाजपावर टीका

Assam Election 2021: भाजप उमेदवाराच्या गाडीत EVM मशीन; प्रियंका गांधींची भाजपावर टीका

Related Story

- Advertisement -

आसामच्या करीमगंजमध्ये बेवारस गाडीत ईव्हीएम आढळल्याने निवडणूक आयोगाने जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडे सविस्तर अहवाल पाठविला आहे. बेवारस गाडीत ईव्हीएम आढळ्यापासून या भागात निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय तणाव वाढला आहे. करीमगंज जिल्ह्यातील कनिसैल शहरात बोलेरो गाडीत हे ईव्हीएम मशीन आढळले असून या गाडीत कोणी नव्हते, अशी माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही बेवारस बोलेरो गाडी पाथरकांडी या मतदार संघातील भाजप उमेदवार कृष्णेंदु पाल यांची असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी जेव्हा नागरिकांच्या तक्रारीनुसार त्या बेवारस गाडीच्या घटनास्थळी भेट दिली, तेव्हा तेथे कोणताही मतदान अधिकारी, निवडणूक आयोगाचा कोणताही कर्मचारी या गाडीच्या आजू-बाजूला देखील नव्हता.

- Advertisement -

या प्रकारानंतर निवडणूक आयोगाने आसामच्या मुख्य निवडणूक अधिकारींच्या माध्यमातून करीमगंजच्या निवडणूक अधिकारी अर्थात डीएमतर्फे विस्तृत अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. दरम्यान, बेवारस गाडीत ईव्हीएम मशीन आढळल्यानंतर त्याच्या व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी वाड्रा यांनी सर्व राजकीय पक्षांकडून ईव्हीएमचे पुनर्मुल्यांकन करण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रश्नचिन्ह उपस्थितीत केले आहे. यावर त्यांनी ट्विट देखील केले आहे. ‘दरवेळी निवडणुकांदरम्यान ईव्हीएम मशीनला खासगी वाहनातून नेले जाते. तेव्हा बर्‍याच गोष्टी घडतात, एकतर वाहन सामान्यत: हे भाजपा उमेदवार किंवा त्यांच्या मित्रपक्षांचेच असतं.’

यासह कॉंग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी वड्रांनी आणखी एका ट्विट केले. यामध्ये यांनी ‘घटनाक्रमानुसार’ स्पष्टीकरण देताना सांगितले की, ‘असे व्हिडिओ एक घटना म्हणून घेतले जातात आणि नंतर ते बाद केले जातात. यासह, भाजपा आपल्या मीडिया तंत्राचा वापर अशा लोकांवर आरोप करण्यासाठी करते ज्यांनी खाजगी वाहनांमध्ये ईव्हीएम मशीन आढळल्याचा व्हिडिओ उघडकीस आणले असेल.’


- Advertisement -