घरदेश-विदेशआसाम: पुराचा ५४ लाख जणांना फटका, ८१ जणांचा मृत्यू

आसाम: पुराचा ५४ लाख जणांना फटका, ८१ जणांचा मृत्यू

Subscribe

कोरोनाशी लढत असताना आसामला पुराचा फटका बसला आहे. आसाममध्ये ३० जिल्ह्यांमधील ५४ लाख नागरिकांन पुराचा फटका बसला असून यामुळे आतापर्यंत ८१ जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, आसामला पूर्ण सहकार्य करण्यात येईल, असं आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलं आहे. या संदर्भात पंतप्रधान मोदींनी आसामचे मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्याशी संवाद साधला असून राज्यातल्या परिस्थितीची माहिती घेतली आहे. राज्याला सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन पंतप्रधान मोदींनी दिलं आहे.

पंतप्रधान मोदींनी संपर्क साधून राज्यातील पुरासंबंधी माहिती घेतल्याचं मुख्यमंत्री सोनोवाल यांनी ट्विटरच्या माध्यमातून सांगितलं. “पंतप्रधान मोदींनी आसाममधील पूरस्थिती, कोरोना संकट आणि बघजन तेलविहिरीतील आगीबद्दलची माहिती फोनवरून घेतली. पंतप्रधानांनी याबद्दल चिंता व्यक्त केली. या कठीण काळात देश तुमच्यासोबत असून राज्याला आवश्यक ती सर्व मदत देण्यात येईल, असं आश्वासन पंतप्रधान मोदींनी दिलं, असं सोनोवाल यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

- Advertisement -

आसाममध्ये पुरामुळे आतापर्यंत ८१ जणांचा मृत्यू झाला आहे. तर भूस्खलनामुळे मृत पावलेल्यांची संख्या २६ इतकी आहे. त्यामुळे या वर्षी पुरामुळे आणि भूस्खलनामळे मृत पावलेल्यांचा आकडा १०७ वर जाऊन पोहोचला आहे. पुराचा फटका बसलेल्या नागरिकांना आतापर्यंत राज्य सरकारकडून ९९ हजार १७६ क्विंटल तांदूळ, १९ हजार ३९७ क्विंटल डाळ आणि १ लाख ७३ हजार लीटर मोहरीच्या तेलाचा पुरवठा करण्यात आला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Coronavirus: त्या दोघींच्या बिनधास्त नृत्यामागील धक्कादायक कारण आले समोर


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -