घरमहाराष्ट्रCoronavirus: त्या दोघींच्या बिनधास्त नृत्यामागील धक्कादायक कारण आले समोर

Coronavirus: त्या दोघींच्या बिनधास्त नृत्यामागील धक्कादायक कारण आले समोर

Subscribe

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या सलोनी सातपुतेने तिचं मत मांडलं

देशात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसागणिक वाढत असला तरी रुग्ण बरे होण्याचा दरही वाढला आहे. कोरोनावर मात करुन आल्यावर लोकांचं केलेलं स्वागत आपण अनेकवेळा माध्यमांमध्ये बघितलं आहे. सध्या समाज माध्यमांवर पुण्याच्या सलोनी सातपुते या तरुणीचा आपल्या बहिणीचं जंगी स्वागत करतानाचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे. आजुबाजूला खडतर वातावरण, घरातील पाच सदस्यांना कोरोनाची लागण अशा परिस्थितीतही संकटाशी हसतमुखाने सामना करण्याच्या सलोनीच्या सेलिब्रेशनला नेटकऱ्यांनीही चांगलीच दाद दिली. मात्र कोरोनाबाधित रुग्णांच्या परिवाराकडे पाहण्याचा दृष्टीकोन समाजाने बदलावा अशी भावना सलोनीने व्यक्त केली.

सलोनी आपल्या परिवारासह पुण्याच्या धनकवडी भागातील आंबेगाव पठार भागात राहते. सलोनी सोडून कुटुंबातील पाचही जण कोरोना पॉझिटिव्ह आले होते. पाचही जणांवर रुग्णालयात उपचार दाखल करण्यात आल्यानं सलोनीला घरात एकटं रहावं लागलं. साहजिकच घरात एकटी असल्यामुळे सलोनीला तिचं एकटेपण खात होतं. परंतु अशावेळी शेजारच्या लोकांनी आपल्याला दिलेली वागणूक सलोनीला जास्त खटकली, असं तिने म्हटलं आहे. नेहमी बोलणारे आजुबाजूचे लोकही या काळात सलोनीशी बोलणं सोडून दिलं होतं. शिवाय, तिला ओळख दाखवणंही बंद केलं होतं. अशावेळी पूर्णपणे खचून जायला होतं. या दरम्यानच्या काळात मला आजुबाजूच्या लोकांकडून मानसिक आधाराची गरज होती, पण दुर्दैवाने असं झालं नाही, असं बोलत सलोनीने आपल्या भावनांना मोकळी वाट करुन दिली.

- Advertisement -

कोरोनाला हरवल्यानंतर असं स्वागत तुम्ही पाहिलं नसेल! Girl Viral Dance Video after Relative Defeat Corona

कोरोनाला हरवल्यानंतर असं स्वागत तुम्ही पाहिलं नसेल! Girl Viral Dance Video after Relative Defeat Corona

Posted by आपलं महानगर – My Mahanagar on Saturday, 18 July 2020

सलोनीच्या घरातील एकापाठोपाठ एक सदस्यांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर सलोनीने स्वतःला होम क्वारंटाइन केलं. आतापर्यंत मी घरात कधीच एकटी राहिली नाही. त्यामुळे मला कमालीचा एकटेपणा जाणवत होता. घरातली सर्व कामं तासाभरात आटपायची…त्यानंतर मी बाहेर जाऊन बसायचे. माझ्या घराजवळून जाणारी लोकं, जी नेहमी माझ्याशी गप्पा मारायची…माझी खुशाली विचारायची तीच लोकं त्या काळात मान खाली घालून माझ्याशी न बोलता पुढे जायची, असं सलोनीने सांगितलं. असा एकटेपणा कोणाच्याही वाटेला येऊ नये. बाधित व्यक्तीच्या कुटुंबातील व्यक्तीकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलायला हवा असं मत सलोनीने व्यक्त केलं. या काळात योग आणि वाचनात स्वतःचं मन रमवत सलोनीने आपलं मानसिक स्वास्थ्य चांगलं राखलं.

- Advertisement -

हेही वाचा – Photo: ‘गटारी’त दंग, नियमांचा भंग


दरम्यान, सलोनीच्या कुटुबांतील सर्वांनी कोरोनावर मात केली आहे. आई-बाबा, आजी-आजोबा घरी परतल्यानंतर सलोनीला जरा आधार मिळाला. बहिण ज्या दिवशी घरी येणार असं समजलं त्यादिवशी तिचं स्वागत करायचं सलोनीनं ठरवलं होतं. “खरतर डान्स करायचा असं मी ठरवलं नव्हतं. पण बहिणीला समोर पाहिल्यानंतर मला राहवलं नाही आणि इतक्या दिवसांचा तणाव मी डान्सच्या माध्यमातून मोकळा केला,” असं सलोनीने सांगितलं.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -