घरCORONA UPDATECorona Live Update: नवी मुंबईत आज २८८ नवे कोरोना रुग्ण आढळले

Corona Live Update: नवी मुंबईत आज २८८ नवे कोरोना रुग्ण आढळले

Subscribe

नवी मुंबई महापालिका क्षेत्रात रविवारी २८८ आणखी नवीन कोरोना रुग्णांची वाढ झाली. त्यामुळे शहरातील एकूण रुग्णांचा आकडा ११४२६ वर गेला आहे. रविवारी २२५ रुग्ण बरे झाले. आतापर्यंत एकूण रुग्णांपैकी ७२१३ रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. सद्यस्थितीत नवी मुंबईत ३८७० ऍक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. नवी मुंबईत आतापर्यंत ३४३ जणांचा मृत्यू झाला आहे.


वसई तालुक्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दहा हजारांवर गेली असून १९९ जणांचा मृत्यू झाला आहे. शनिवारी दिवसभरात नव्या २९८ रुग्णांची भर पडल्याने रुग्णांची संख्या १० हजार ०९ वर गेली आहे. तर दिवसभरात पाच जणांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा १९९ झाला आहे. शनिवारी वसई-विरार महापालिका हद्दीत २९२ कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले. तर ग्रामीण परिसरात सहा नवे रुग्ण आढळले. महापालिका हद्दीतील रुग्णांची संख्या ९ हजार ५७६ वर पोहचली आहे. वसईत १०६, नायगावमध्ये ९, वसई-विरार परिसरात १५, नालासोपार्‍यात ७३ आणि विरारमध्ये ९० रुग्ण आढळले आहेत. तर वसईत दोन आणि नालासोपार्‍यात तीन मिळून शहरात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृतांचा आकडा १८९ वर गेला आहे.

- Advertisement -

कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात १९ जुलैपर्यंत लॉकडाऊन घोषित करण्यात आला होता. हा लॉकडाऊन आज संध्याकाळी ५ वाजता संपला. त्यानंतर महापालिका आयुक्तांनी नवे परिपत्रक काढत कोरोना हॉटस्पॉट असलेल्या विभागांमध्ये ३१ जुलैपर्यंत लॉकडाऊन वाढविण्यात येत असल्याची घोषणा केली.

 

- Advertisement -

kdmc lockdown extend


औरंगाबादमध्ये अँटिजन टेस्टमध्ये ८५ व्यापारी कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत, अशी माहिती औरंगाबाद पालिका आयुक्त आस्तिक कुमार पांडेय यांनी दिली आहे. एका व्यापाऱ्याच्या कुटुंबातील १४ सदस्या कोरोनाबाधित झाले आहेत. सविस्तर वाचा 


देशात १८ जुलैपर्यंत १ कोटी ३७ लाख ९१ हजार ८६९ नमुन्यांच्या चाचण्या झाल्या आहेत. यापैकी शनिवारी ३ लाख ५८ हजार १२७ नमुन्यांच्या चाचण्या झाल्या आहेत, अशी माहिती आयसीएमआर दिली आहे.


देशात गेल्या २४ तासांत सर्वाधिक ३८ हजार ९०२ कोरोनाबाधित नव्या रुग्णांची वाढ झाली असून ५४३ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा १० लाख ७७ हजार ६१८वर पोहोचला असून आतापर्यंत २६ हजार ८१६ जणांचा मृत्यू झाला आहे. सविस्तर वाचा 


औरंगाबाद जिल्ह्यात आणखी १३४ रुग्णांची नोंद झाली आहेत. त्यामुळे औरंगाबाद जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा १० हजार ५३८वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत ३९२ जणांचा मृत्यू झाला.


जगभरात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढताना दिसत आहे. वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत जगभरातील कोरोनाबाधितांचा आकडा १ कोटी ४४ लाख २५ हजारांहून अधिक आहे. यापैकी आतापर्यंत ६ लाख ४ हजारांहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. तर ८६ लाख १२ हजारांहून अधिक जण कोरोनामुक्त झाले आहेत.


शनिवारी राज्यात ८ हजार ३४८ नव्या रुग्णांची नोंद झाली असून १४४ जणांना मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा ३ लाख ९३७वर पोहोचला आहे. सविस्तर वाचा 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -