घरदेश-विदेशएसबीआयच्या ७० हजार कर्मचाऱ्यांना झटका

एसबीआयच्या ७० हजार कर्मचाऱ्यांना झटका

Subscribe

बँकेकडून देण्यात आलेल्या सूचनेनंतर ७० हजार कर्मचाऱ्यांना मोठा झटका लागला आहे. हे सर्व कर्मचारी एसबीआयच्या सहयोगी बँकांमधील आहेत.

स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) कडून ७० हजार कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना ओव्हरटाईमसाठी देण्यात आलेले पैसे परत बँकेला देण्यासाठी सांगण्यात आलं आहे. बँकेकडून देण्यात आलेल्या सूचनेनंतर ७० हजार कर्मचाऱ्यांना मोठा झटका लागला आहे. हे सर्व कर्मचारी एसबीआयच्या सहयोगी बँकांमधील आहेत. नोटबंदीच्या काळात सर्व एसबीआय बँकांनी आपल्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांकडून अतिरिक्त काम करवून घेतलं आणि त्याबदल्यात ओव्हरटाईमचे अतिरिक्त पगार देण्याचं कबूल केलं होतं.

नोव्हेंबर २०१६ मध्ये झाली नोटबंदी

नोव्हेंबर २०१६ मध्ये झालेल्या नोटबंदीनंतर एसबीआयच्या कर्मचाऱ्यांकडून ओव्हरटाईम करून घेतल्यानंतर त्यांना त्याचे पैसे प्रदान करण्यात आले. मात्र आता एसबीआयनं या कर्मचाऱ्यांकडून हे पैसे परत मागितले आहेत. ८ नोव्हेंबर, २०१६ रोजी करण्यात आलेल्या नोटबंदी दरम्यान सर्वांनाच या समस्येला सामोरं जावं लागलं होतं. एसबीआयच्या असोसिएट बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ पटियाला, स्टेट बँक ऑफ हैदराबाद, स्टेट बँक ऑफ मैसूर, स्टेट बँक ऑफ ट्रावणकोर आणि स्टेट बँक ऑफ बिकानेर आणि जयपूर यांचं १ एप्रिल, २०१७ मध्ये एसबीआयमध्ये विलिनीकरण करण्यात आलं होतं. या सर्वच कर्मचाऱ्यांना ओव्हरटाईमचे पैसे देण्यात आले होते.

- Advertisement -

एसबीआयचा काय आहे तर्क?

एसबीआयनं यासंदर्भात क्षेत्रीय मुख्य कार्यालयांना पाठवलेल्या पत्रात केवळ आपल्या बँक कर्मचाऱ्यांनाच ओव्हरटाईमचे पैसे देण्यात यावे असं नमूद केलं आहे. असोसिएट बँकातील कर्मचाऱ्यांसाठी हे पैसे नाहीत. केवळ एसबीआयमध्ये कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठीच ही योजना असल्याचंही यामध्ये नमूद करण्यात आलं आहे. त्यावेळी असोसिएट बँकांचं एसबीआयमध्ये विलिनीकरण करण्यात आलं नव्हतं. त्यामुळं त्यांना एसबीआयचे कर्मचारी मानण्यात येणार नाही असंही स्पष्ट करण्यात आलं आहे.

किती मिळाला होता भरणा

नोटबंदी काळात बँकांच्या बाहेर लांबच्या लांब रांगा लागल्यामुळं खूपच त्रास झाला होता. यावेळी बँकेच्या कर्मचाऱ्यांनी प्रतिदिन ३ ते ८ तास जास्त काम केलं होतं. या ओव्हरटाईमचा भरणा म्हणून अधिकाऱ्यांना ३० हजार तर कर्मचाऱ्यांना १७ हजार रुपये भरणा देण्यात आला होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -