घरदेश-विदेशतुमचं SBI मध्ये खातं आहे? मग हे वाचाच!

तुमचं SBI मध्ये खातं आहे? मग हे वाचाच!

Subscribe

स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये जर तुमचं खातं असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण एसबीआयनं नुकतंच देशभरातल्या सुमारे १२०० ब्रँचमध्ये महत्त्वाचे बदल केले आहेत. त्यामुळे याचा थेट परिणाम या ब्रँचमध्ये खाती असणाऱ्या लाखो खातेदारांवर होणार आहे. हा नक्की बदल काय आहे? आणि त्याचा नेमका काय परिणाम होणार आहे? हे खातेदारांसाठी महत्त्वाचं ठरणार आहे.

स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये जर तुमचं खातं असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण एसबीआयनं नुकतंच देशभरातल्या सुमारे १२०० ब्रँचमध्ये महत्त्वाचे बदल केले आहेत. त्यामुळे याचा थेट परिणाम या ब्रँचमध्ये खाती असणाऱ्या लाखो खातेदारांवर होणार आहे. हा नक्की बदल काय आहे? आणि त्याचा नेमका काय परिणाम होणार आहे? हे खातेदारांसाठी महत्त्वाचं ठरणार आहे.

१२९५ शाखांची नावं, आयएफएससी कोड बदलले

देशभरातील तब्बल १३०० शाखांची नावं आणि आयएफएससी कोड एसबीआयनं बदलले आहेत. त्यामुळे या सर्व शाखांमध्ये खाती असणाऱ्या खातेदारांना आता आपापल्या ब्रँचमध्ये जाऊन नवीन नाव आणि आयएफएससी कोडची खातरजमा करावी लागणार आहे. त्यामुळे आता तुमचं खातं असणाऱ्या कोणत्या शाखेविषयी कुठे माहिती देत असाल, तर आधी तुमच्या शाखेचं नाव आधीचंच आहे की बदललं आहे, हे तपासून पाहा. शिवाय एसबीआयच्या वेबसाईटवरही ही माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे.

- Advertisement -

खातेदारांना काय करावं लागणार?

एसबीआयने त्यांच्या शाखांची नावं आणि आयएफएससी कोड बदलल्यामुळे सामान्य खातेदारांना काही बाबी ध्यानात घ्याव्या लागतील…

  • कोणत्याही कागदपत्रांवर शाखा आणि आयएफएससी कोड देण्यापूर्वी तो बदलला आहे की नाही याची खातरजमा करा
  • ऑनलाईन व्यवहार करताना किंवा पैसे ट्रान्सफर करताना आयएफएससी कोड आणि शाखेचं नाव द्यावं लागतं. तिथे नवीन नाव आणि कोड द्या
  • बँकेच्या पासबुकवर आणि चेकबुकवर जुनेच नाव आणि कोड असल्यास त्यासंदर्भात त्वरित आपल्या शाखेशी संपर्क साधून आवश्यक असल्यास बदल करून घ्या

का बदलली एसबीआयनं नावं?

फेब्रुवारी २०१७मध्ये संसदेमध्ये स्टेट बँक रिपील अँड अमेंडमेंट विधेयक पारित करण्यात आलं. या विधेयकानुसार देशातल्या सार्वजनिक क्षेत्रातील ५ बँकांचं एसबीआयमध्ये विलीनीकरण करण्यात आलं. यामध्ये –

- Advertisement -
  • स्टेट बँक ऑफ हैदराबाद
  • स्टेट बँक ऑफ बिकानेर
  • स्टेट बँक ऑफ पटियाला
  • स्टेट बँक ऑफ मैसूर आणि
  • स्टेट बँक ऑफ त्रावणकोर

या बँकांचा समावेश आहे. यासोबतच भारतीय महिला बँकेचेही एसबीआयमध्ये विलिनीकरण करण्यात आले. १ एप्रिल २०१७पासून या सर्व बँकांच्या विलिनीकरणाची प्रक्रिया सुरू करण्यात आली. यामुळे एसबीआयच्या कामकाजाचा परीघ वाढला असून या सर्व बँकांच्या खातेदारांना एसबीआयच्या मुख्य प्रक्रियेमध्ये सामील करून घेण्यासाठी शाखांची नावं आणि आयएफएससी कोड बदलण्याचा निर्णय घेण्यात आला. या विलिनीकरणानंतर एसबीआय जगभरातल्या बँकांमध्ये ५३व्या स्थानावर पोहोचली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -