घरदेश-विदेशAyodhya Dispute : राम मंदिरावर सुनावणी अखेर संपली, पण निर्णय राखून ठेवला!

Ayodhya Dispute : राम मंदिरावर सुनावणी अखेर संपली, पण निर्णय राखून ठेवला!

Subscribe

अयोध्येप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पूर्ण झाली असून त्यावरचा निर्णय मुख्य न्यायमूर्ती रंजन गोगोई यांनी राखून ठेवला आहे.

गेल्या कित्येक वर्षांपासून सुरू असलेल्या अयोध्येतील वादग्रस्त जमिनीवरून सुरू असलेला वाद आता शमण्याची चिन्ह आहेत. सप्टेंबर महिन्यात सर्वोच्च न्यायालयात राम मंदिर प्रकरणी सुनावणी सुरू झाली होती. अखेर आज १६ ऑक्टोबर रोजी ही सुनावणी पूर्ण झाली आहे. मात्र, त्यावर लागलीच निर्णय न देता आपला निकाल न्यायालयाने राखून ठेवला आहे. सर्वोच्च न्यायालयात ३९ दिवस ही सुनावणी सुरू होती. भारताचे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्यासमोर झालेल्या या सुनावणीत दिवसभर दोन्ही बाजूंनी आपली बाजू मांडली. दरम्यान, पुढच्या २३ दिवसांमध्ये म्हणजेच १७ नोव्हेंबरपूर्वी हा निकाल येण्याची शक्यता आहे. कारण, सरन्यायाधीश रंजन गोगोई १७ नोव्हेंबरला निवृत्त होणार आहेत. त्यामुळे त्याआधीच निर्णय येणार आहे. सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर अयोध्येमध्ये वादग्रस्त ठिकाण आणि आसपासच्या भागामध्ये जमावबंदीसाठी कलम १४४ लागू करण्यात आलं आहे. ९ डिसेंबरपर्यंत ही जमावबंदी लागू असेल.

- Advertisement -

दरम्यान, सर्वोच्च न्यायलयाने या प्रकरणी उर्वरीत प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी दोन्ही पक्षांना ३ दिवसांचा कालावधी दिला आहे. येत्या तीन दिवसांमध्ये ही प्रतिज्ञापत्र सादर झाल्यानंतर १७ नोव्हेंबर पूर्वी म्हणजेच येत्या २३ दिवसांमध्ये कधीही अयोध्याप्रकरणी निकाल येण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

दरम्यान, सुनावणी पूर्ण होण्याआधी सर्वोच्च न्यायालयात अयोध्या सुनावणीवेळी हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. मुस्लिम पक्षकारांची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील राजीव धवन यांनी वादग्रस्त जमिनीवरील सीमा दाखवणारे नकाशे फाडून टाकले. अखिल भारतीय हिंदू महासभेच्या वतीने हे नकाशे पक्षकारांना देण्यात आले होते.

दरम्यान, यावेळी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी या प्रकारावर तीव्र नाराजी व्यक्त केली. ‘जर अशा प्रकारे तुम्ही वाद घालणार असाल, तर आम्ही सुनावणीमधून निघून जाऊ’, अशी भूमिका रंजन गोगोई यांनी जाहीर केली. त्यानंतर मात्र, दोन्ही पक्षकारांनी शांततेत आपापली बाजू मांडली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -