घरदेश-विदेशअयोध्येत प्रजासत्ताकदिनी तिरंगा फडकवून मशिदीच्या कामाचा श्रीगणेशा!

अयोध्येत प्रजासत्ताकदिनी तिरंगा फडकवून मशिदीच्या कामाचा श्रीगणेशा!

Subscribe

ट्रस्टच्या सर्व १२ सदस्यांनी तेथे रोपे लावून माशिदीचे औपचारिक काम केले सुरू

उत्तर प्रदेशातील अयोध्येत ७२ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त तिरंगा फडकवून आणि झाडे लावून मशिदीच्या औपचारिक कामाचा श्रीगणेशा करण्यात आला. २०१९ च्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर रामजन्मभूमीतील अयोध्या मंदिराच्या मान्यतेसह त्याच जिल्ह्यात मशीद तयार करण्यास देखील मान्यता देण्यात आली. इंडो-इस्लामिक कल्चरल फाउंडेशन ट्रस्ट अयोध्येतील धन्नीपूर गावात पाच एकर जागेवर मशिदी उभारणार आहे. त्याचा पाया प्रजासत्ताकदिनी सकाळी ८.१५ वाजता रचन्यात आला. हे गाव रामजन्मभूमीपासून सुमारे २५ किलोमीटर अंतरावर असून जिथे भगवान रामाचे मंदिर उभारण्यात येत आहे. याठिकाणी ट्रस्टचे प्रमुख जफर अहमद फारूकी यांच्या हस्ते सकाळी साडेआठ वाजेच्यादरम्यान ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर, ट्रस्टच्या सर्व १२ सदस्यांनी तेथे रोपे लावून माशिदीचे औपचारिक काम सुरू केले.

- Advertisement -

‘आम्ही त्या ठिकाणी असणाऱ्या मातीच्या परीक्षणाचे काम सुरू केले आहे. एकदा मातीच्या परीक्षणाचा अहवाल आला आणि नकाशा पास झाला की, बांधकामास सुरूवात होईल. मशिदीच्या बांधकामासाठी देणगी देण्याची विनंती केली आहे आणि लोक बांधकामासाठीच्या निधीमध्ये हातभार लावत आहेत, असे ट्रस्टचे प्रमुख जफर अहमद फारूकी यांनी सांगितले.

यंदाच्या प्रजासत्ताक दिनी संपूर्ण देशभरात उत्साह पहायला मिळाला. संपूर्ण देशभरात प्रजासत्ताक दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. राजपथावर सकाळी देशाचे प्रतंप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती रामनाथ कोविंद त्याचप्रमाणे केंद्रिय मंत्रालयातील अनेक मंत्री आणि दिग्गज नेत्यांच्या उपस्थित ध्वजारोहण करुन राजपथावरील कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी अनेक शासकीय कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. राजपथावर होणारे पथसंचलन हा दरवर्षीच आकर्षणाचा विषय होता. यंदाही त्याच उत्साहात पथसंचलनाचा कार्यक्रम पार पडला.
Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -