घरदेश-विदेशशेतकऱ्यांच्या आंदोलनाचे अमेरिकेत पडसाद; भारतीय दूतवासासमोर फडकावले खलिस्तानी झेंडे

शेतकऱ्यांच्या आंदोलनाचे अमेरिकेत पडसाद; भारतीय दूतवासासमोर फडकावले खलिस्तानी झेंडे

Subscribe

केंद्राने आणलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात देशभरातील शेतकरी गेले दोन महिने दिल्लीच्या सीमांवर आंदोलन करत आहेत. मंगळवारी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत सरकारचा निषेध करण्यासाठी शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर परेड काढली. मात्र, या परेडला हिंसक वळण लागलं. गेले दोन महिने शेतकरी शांततेत आंदोलन करत होते. मात्र, मंगळवारी या आंदोलनाला गालबोट लागलं. दरम्यान, शेतकरी आंदोलनाचे पडसाद अमेरिकेत देखील उमटले. अमेरिकेच्या वॉशिंग्टन डीसीमध्ये खलिस्तान समर्थकांनी कृषी कायदे मागे घेण्यासाठी अमेरिकेतील भारतीय दूतावासासमोर आंदोलन केलं. यावेळी खलिस्तानी झेंडे देखील फडकावले.

केंद्राच्या तीन नव्या कृषी कायद्यांविरोधात शेतकरी आंदोलन करत आहेत. जो पर्यंत केंद्र सरकार कृषी कायदे मागे घेत नाही तोपर्यंत मागे हटणार नाही, असा आक्रमक पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला आहे. शेतकऱ्यांच्या कृषी कायदे मागे घेण्याच्या आंदोलनाला खलिस्तानी समर्थकांनी पाठिंबा दिला आहे. दरम्यान, प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून खलिस्तान समर्थकांनी अमेरिकेतील भारतीय दूतावासासमोर आंदोलन केलं. खलिस्तानी झेंडे फडकावत कृषी कायदे मागे घेण्याची मागणी केली.

- Advertisement -

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -