घरCORONA UPDATEसकाळी कोरोनाचा रिपोर्ट आला पॉझिटिव्ह आणि संध्याकाळी....

सकाळी कोरोनाचा रिपोर्ट आला पॉझिटिव्ह आणि संध्याकाळी….

Subscribe

देशभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. दिवसेंदिवस कोरोना रूग्णांची संख्या वाढत आहे. पण दररोज कोरोना व्हायरसच्या संबंधित विचीत्र घटनाही घडत आहेत. अशीच उत्तर प्रदेशातील एक घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशच्या बरेलीच्या महेशपुरा येथील एका तरूणाला सकाळी खासगी लॅबमध्ये केलेली कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली. पण संध्याकाळी IVRI मधून केलेली कोरोनाची चाचणी निगेटिव्ह आली. तर प्रायव्हेट लॅबमध्ये चारवेळा कोरोनाची चाचणी करूनही ती पॉझिटिव्हच दाखवण्यात आली. त्यामुळे अनेक प्रश्न उभे राहीले आहेत. या तरूणाच्या नातेवाईकांची टेस्टसुध्दा निगेटीव्ह आली आहे.

महेशपुरामध्ये राहणारा ३५ वर्षीय तरूण ट्रक ड्रायव्हर होता. १ मेला झालेल्या अपघातात तो जखमी झाला. त्याच्यावर जवळील हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले. ६ मेला तो डॉक्टरांकडे जखम दाखवायला गेला असता. डॉक्टरांनी त्याला कोरोना व्हायरसची चाचणी करण्याचा सल्ला दिला. तरूणाने जवळच असलेल्या लॅबमध्ये कोरोना चाचणी करून घेतली. शनिवारी या तरूणाची कोरोनाची टेस्ट पॉझिटिव्ह आल्याचा रिपोर्ट आला.

- Advertisement -

त्याचा कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह येताच आरोग्य विभाग सक्रीय झाला. मेडिकल मोबाईल युनीट या तरूणाच्या घरी आले. यावेळी या तरूणाबरोबरच संपुर्ण कुटुंबाचे सॅम्पल घेण्यात आले. तरूणाला अऍम्बुलन्समधून हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले. तर कुटुंबाला होम क्वारंटाईन करण्यात आले. तर रात्री तरूणाची आईवीआरआई चाचणी करण्यात आली. मात्र यावेळी तरूणाची त्याच्या कुटुंबाची चचाणी निगेटिव्ह आली.


हे ही वाचा – एसटीची मोफत सेवा नाहीच, १२ तासात सरकारचा यूटर्न!

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -