घरAssembly Battle 2022Punjab Election 2022: अमृतसर येथील रोड शोदरम्यान भगवंत मान यांच्यावर हल्ला; डोळ्यांना...

Punjab Election 2022: अमृतसर येथील रोड शोदरम्यान भगवंत मान यांच्यावर हल्ला; डोळ्यांना दुखापत

Subscribe

एका अज्ञात व्यक्तीने भगवंत मान यांच्यावर टोकदार वस्तू फेकून हल्ला केल्याचा व्हिडिओ सोशल मीडिया समोर आला आहे.

पंजाब विधानसभा निवडणुकीची (Punjab Aseembly Election 2022) मतदान प्रक्रिया सुरू होण्यासाठी अवघे काही दिवस बाकी आहे. त्यामुळे सध्या पंजाबमध्ये रणधुमाळी सुरू असून राजकारण चांगलेच तापले आहे. याचवेळी आज अटारी भागात निवडणुकीच्या प्रचारादरम्यान आम आदमी पार्टीचे (AAP) मुख्यमंत्री पदाचा चेहरा असलेले भगवंत मान (Bhagwant Mann) यांच्या हल्ला झाल्याचे समोर आले आहे. भगवंत मान यांच्यावर फुलांचा वर्षाव करताना टोकदार वस्तूने त्यांच्यावर हल्ला केला गेला. ज्यामध्ये त्यांच्या डोळ्या जवळ दुखापत झाल्याचे म्हटले जात आहे.

- Advertisement -

आज अटारी भागात भगवंत मान यांनी रोड शो काढला होता. यादरम्यान त्यांच्या तोंडावर टोकदार वस्तू मारली गेली. त्यामुळे त्यांच्या डोळ्याजवळ दुखापत झाली आणि काही वेळासाठी ते गाडीच्या आतमध्ये बसले. हल्ला झाल्याच्या काही वेळानंतर भगवंत मान यांनी पुन्हा निवडणुकीसाठी प्रचार सुरू केला. माहितीनुसार, रोड शो दरम्यान भगवंत मान यांच्यावर फुलांचा वर्षाव केला जात होता. परंतु याचदरम्यान एका अज्ञात व्यक्तीने टोकदार वस्तू त्यांच्यावर फेकली. सध्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

जानेवारी महिन्यात आम आदमी पार्टीने पंजाब विधानसभा निवडणुकीसाठी भगवंत मान यांना पक्षाचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणून दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी घोषणा केली होती. ४८ वर्षीय भगवंत मान पंजाबमधील आम आदमी पार्टीचा सर्वात मोठा चेहरा आहे. २०१९च्या लोकसभा निवडणुकीमध्ये ते आपचे असे एकटे उमदेवार होते, जे जिंकले होते. पंजाबच्या संगरूर लोकसभा मतदारसंघातील ते आपचे खासदार आहेत आणि आपच्या पंजाब युनिटचे अध्यक्ष आहेत. तसेच भगवंत मान आपचे पंजाब यूनिटचे सर्वात लोकप्रिय नेते आहेत. सध्या पंजाब विधानसभामध्ये आम आदमी पार्टी हा एक प्रमुख विरोधी पक्ष आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Punjab AAP CM Candidate: पंजाबमध्ये CM पदाचा AAPचा चेहरा असणारे भगवंत मान कोण आहेत?


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -