घरताज्या घडामोडीVaccination: भारत अफगाणिस्तानच्या मदतीला, ५ लाख Covaxin लसीचे डोस दिले

Vaccination: भारत अफगाणिस्तानच्या मदतीला, ५ लाख Covaxin लसीचे डोस दिले

Subscribe

भारताने कोव्हॅक्सिन लसीच्या ५ लाख डोसची तुकडी इंदिरा गांधी हॉस्पिटल काबूलकडे सुपूर्द केली.

कोरोना महामारीच्या काळात जगातील अनेक देश एकमेकांना मदत करताना दिसत आहेत. मग ती कोरोना प्रतिबंधात्मक लसीची मदत असो किंवा आरोग्य संबंधित इतर साहित्यांची मदत असो. अनेक गोष्टींची देवाणघेवाण करून या महामारीच्या काळात एकमेकांना देश मदतीचा हात देत आहेत. अशाप्रकारे भारत देखील अनेक देशांमध्ये लसीचा पुरवठा करत आहे. आता भारताने अफगाणिस्तानला मानवतावादी सहाय्यता अंतर्गत कोव्हॅक्सिन लसीच्या ५ लाख डोस दिले आहेत. याबाबतची माहिती भारत बायोटेक कंपनीने दिली आहे.

भारताने कोव्हॅक्सिन लसीच्या ५ लाख डोसची तुकडी इंदिरा गांधी हॉस्पिटल काबूलकडे सुपूर्द केली आहे. येत्या आठवड्यात अफगाणिस्तानला आणखीन ५ लाख अतिरिक्त डोस दिले जाणार आहे. यापूर्वी भारताने अफगाणिस्तानला लसीच्या डोसचा पुरवठा केला होता. या तुकडीमध्येही ५ लाख कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे डोस होते. याशिवाय भारताने मानवतावादी सहाय्यता अंतर्गत अफगाणिस्तानला अन्नधान्य, १० लाख लसीचे डोस आणि आवश्यक औषधे देण्याची घोषणा केली होती. गेल्या महिन्यात डिसेंबरच्या सुरुवातीला भारताने जागतिक आरोग्य संघटने मार्फत अफगाणिस्तानला १.६ टन वैद्यकीय मदत दिली होती.

- Advertisement -

अफगाणिस्तानमधील कोरोनाची परिस्थिती?

अफगाणिस्तानमध्ये आतापर्यंत १ लाख ५८ हजार १८३ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. यापैकी आतापर्यंत ७ हजार ३६४ जणांचा मृत्यू झाला असून १ लाख ४५ हजार ६९७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. अफगाणिस्तानमधील सध्या सक्रिय रुग्णांची संख्या ५ हजार १२२ आहे.


हेही वाचा – Corona: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम; गर्दी टाळण्यासाठी नवीन वेळापत्रक

- Advertisement -

 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -