घरCORONA UPDATEभारत बायोटेक वाढविणार Covaxinचे उत्पादन, गुजरात प्लँटसोबत तयार करणार २०कोटी लसीचे डोस

भारत बायोटेक वाढविणार Covaxinचे उत्पादन, गुजरात प्लँटसोबत तयार करणार २०कोटी लसीचे डोस

Subscribe

GMP नियमांनुसार, दरवर्षी २० कोटी कोव्हॅक्सिन लसींचे उत्पादन घेण्याची योजना

भारतात कोव्हॅक्सिन (Covaxin) लसीचे उत्पादन करणाऱ्या भारत बायोटेक (Bharat biotech) कंपनीने महत्त्वाची माहिती दिली आहे. भारत बायोटेक आता कोव्हॅक्सिन लसीचे उत्पादन वाढवणार आहे. त्या संबंधी भारत बायोटेकने एक निवेदन जारी केले आहे. त्यात असे म्हटले आहे की, भारत बायोटेक कंपनी आपल्या गुजरात प्लँटद्वारे एका वर्षांत २० कोटी कोव्हॅक्सिन लसीच्या डोसांचे उत्पन्न करणार आहे. त्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वेगाने उत्पादन सुरु करण्यात आले आहे त्याचबरोबर अतिरिक्त लॅबची व्यवस्था करण्यात येत आहे. भारत बायोटेकची संपूर्ण मालकी असलेल्या चिरॉन बेरिंग व्हेक्सिनने भारतातील पहिल्या स्वदेशी कोरोना लसीच्या म्हणजेच कोव्हॅक्सिनच्या उत्पादनाचा वेग वाढवण्याची घोषणा केली आहे. (Bharat biotech increase production of Covaxin, Gujarat plant to produce 200 million vaccine doses)

- Advertisement -

देशात मोठ्या प्रमाणात कोरोना लसीकरणाला सुरुवात करण्यात आली मात्र लसीच्या तुटवड्यांमुळे अनेक ठिकाणी लसीकरण बंद करावे लागले. देशातील कोरोना लसीची कमतरता लक्षात घेता त्या दृष्टीने कंपनी GMP (Good manufacturing practice) नियमांनुसार, दरवर्षी २० कोटी कोव्हॅक्सिन लसींचे उत्पादन घेण्याची योजना आखत आहे. त्यानुसार गुजरातच्या अंकलेश्वरमध्ये कोव्हॅक्सिनचे उत्पादन २०२१च्या चौथ्या तिमाहीपासून सुरु होईल.

गुजरातमधील अंकलेश्वर (Gujrat Ankaleshwar) येथे चिरॉन बेगरिं व्हॅकीन्स प्रायव्हेट लिमिटेड ही भारत बायोटेकची उपकंपनी आहे. ही कंपनी चिरॉन बेरिंग व्हॅक्सिन्स चीरोन कार्पोरेशन USच्या वतीने तयार करण्यात आली आहे. जगात रेबीजचे इंजेक्शन तयार करणाऱ्या कंपन्यांपैकी ही एक कंपनी आहे. भारत बायोटेकने जगभरात आतापर्यंत कोरोना लसीचे ५ अब्ज डोस तयार केले आहेत. त्याचबरोबर Influenza H1N1,रोटा व्हायरस, जपानी एन्सेफलायटीस, रेबीज त्याचबरोबर चिकनगुनिया,झिका, कॉलरा,टिटॅनस आणि टायफाइड सारख्या आजारांवरही लस तयार केली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Remdesivir इंजेक्शन WHO ने Prequalification list मधून वगळले

 

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -