घरताज्या घडामोडीममता बॅनर्जींनी मुख्यमंत्रीपद राखले, पोटनिवडणुकीत ५८ हजार मतांनी विजयी

ममता बॅनर्जींनी मुख्यमंत्रीपद राखले, पोटनिवडणुकीत ५८ हजार मतांनी विजयी

Subscribe

पश्चिम बंगालचे मुख्यमंत्रीपद स्वतःकडे कायम राखण्यासाठी ममता बॅनर्जींना हा विजय आवश्यक होता.

पश्चिम बंगालमधील भवानीपूर पोटनिवडणुकीत तृणमूल काँग्रेसच्या उमेदवार आणि प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या ५८,८३२ मतांनी विजयी झाल्या आहेत. त्यामुळे त्यांचे मुख्यमंत्रीपद अबाधित राहिले आहे. त्यांनी भाजपच्या प्रियंका टिबरेवाल यांचा पराभव केला. या पोटनिवडणुकीसाठी ३० सप्टेंबर रोजी मतदान झाले होते. रविवार सकाळी आठ वाजल्यापासून येथील मतमोजणीला सुरुवात झाली. मतमोजणीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. भवानीपूरमधील जनतेची मी आभारी आहे, अशी प्रतिक्रिया ममता बॅनर्जी यांनी विजयी झाल्यावर दिली.

पश्चिम बंगालचे मुख्यमंत्रीपद स्वतःकडे कायम राखण्यासाठी ममता बॅनर्जींना हा विजय आवश्यक होता. कारण, मे महिन्यात नंदीग्राम मतदारसंघात झालेल्या निवडणुकीत त्यांचा पराभव झालेला होता. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत टीएमसीने एकहाती सत्ता आणलेली जरी असली, तरी देखील ममता बॅनर्जी या स्वतः निवडणुकीत पराभूत झाल्या होत्या. त्यामुळे त्यांना सहा महिन्याच्या आत कायदेशीरदृष्ठ्या निवडून येणे गरजेचे होते. त्यामुळे या पोटनिवडणुकीला विशेष महत्व होते. भवानीपूर हा ममता बॅनर्जींचा पारंपारीक मतदारसंघ आहे.

- Advertisement -

तृणमूल नेत्यांनी शनिवारी रात्री दावा केला होता की मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या ५०,००० पेक्षा जास्त मतांनी जिंकणार आहेत. हा दावा खरा ठरला. मार्च-एप्रिल विधानसभा निवडणुकीत भवानीपूरची जागा जिंकलेल्या शोभनदेव चट्टोपाध्याय यांच्यापेक्षा जास्त फरकाने ममता बॅनर्जी विजयी झाल्या आहेत. ३० सप्टेंबरच्या पोटनिवडणुकीत भवानीपूरच्या २,०६,३८९ मतदारांपैकी केवळ ५७.०९ टक्के मतदान झाले. तर २६ एप्रिल रोजी चट्टोपाध्याय यांनी निवडणूक लढवली तेव्हा हा आकडा ६१.७९ टक्के होता. चट्टोपाध्याय २८,७१९ मतांच्या फरकाने विजयी झाले होते.

पराभूत झालेल्या भाजप उमेदवार प्रियंका टिबरेवाल म्हणाल्या की, मी या खेळाची ‘मॅन ऑफ द मॅच’, कारण मी ममता बॅनर्जींचा बालेकिल्ला असलेल्या मतदारसंघामधून निवडणूक लढवली आणि २५ हजारांपेक्षा अधिक मते मिळवली. कठोर परिश्रम सुरू ठेवेन आणि यापुढे देखील ममता बॅनर्जींना आव्हान देण्यासाठी सज्ज आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -