घरताज्या घडामोडीदिवंगत सुशांत सिंह राजपूतच्या नातेवाईकांचा अपघात; ६ जणांचा मृत्यू

दिवंगत सुशांत सिंह राजपूतच्या नातेवाईकांचा अपघात; ६ जणांचा मृत्यू

Subscribe

बिहारच्या लखीसरायमधील भीषण अपघातात एकाच कुटुंबियातील ६ जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. या अपघातामध्ये ४ जण गंभीर जखमी झाले आहेत. हे सर्वजण एका ठिकाणी अंत्यसंस्कार करून सुमो गाडीने जमुईला परतत होते, तेव्हा ट्रक त्यांचा कारला धडकला. माहितीनुसार या भीषण अपघातामध्ये मृत्यू झालेले लोकं दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतचे नातेवाईक होते.

आज, मंगळवारी लखीसराय जिल्ह्यातील सिकंदरा-शेखपूरा NH-333वर हलसी ठाणे क्षेत्रातील पिपरा गावाजवळ ही घटना घडली. ट्रकमुळे झालेल्या भीषण अपघातामुळे सुमो गाडीतून प्रवास करत असलेले एकाच कुटुंबातील ६ जणांचा घटनास्थळी मृत्यू झाला. तर ४ जण गंभीर जखमी झाले. या गंभीर जखमी झालेल्या ४ जणांना जमुईच्या जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

- Advertisement -

माहितीनुसार, जमुई जिल्ह्याच्या खैरा ठाणे क्षेत्रातील सगदाहा भंदरा गावच्या लालजीत सिंहची पत्नी गीता देवीच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याच्या कार्यक्रमात सामील झाले होते. त्यानंतर कुटुंबियांसह ते सुमो गोल्ड गाडीतून परतत होते. परंतु रस्त्यामध्येच गाडीचा भीषण अपघात झाला. ज्यामध्ये गीता देवीचे पती लालजीत सिंह, मोठा मुलगा अमित शेखर ऊर्फ नेमानी सिंह, छोटा मुलगा रामचंद्र सिंह, मुलगी बेवी देवी, भाची अनिता देवी आणि चालक प्रतीम कुमार यांचा जागीच मृत्यू झाला.

सुशांत सिंह राजपूतची काय आहे संबंध?

अपघातात मृत्यू झालेला लालजीत सिंह नावाचे व्यक्ती दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मेहुण्याचा मेहुणा होता. सुशांत सिंह राजपुतचा मेहुणा हरयाणा पोलीस खात्यातील उच्च पदावर कार्यरत असून त्यांचे नाव ओमप्रकाश सिंह आहे. ओमप्रकाश सिंहची बहीण गीता देवीच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करून पटनाहून कुटुंबिय घरी परतत होते आणि त्यादरम्यान भीषण अपघात झाला. या भीषण अपघातामुळे कुटुंबासह संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – एकीच मारा लेकीन सॉलिड मारा! कंगना समर्थक विक्रम गोखलेंवर अतुल कुलकर्णीचे मार्मिक ट्विट


Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -