घरताज्या घडामोडीBirsa munda jayanti : बिरसा मुंडा यांचे देशात आणखी ९ संग्रहालय उभारणार...

Birsa munda jayanti : बिरसा मुंडा यांचे देशात आणखी ९ संग्रहालय उभारणार – पंतप्रधान नरेंद्र मोदी

Subscribe

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रांची,झारखंडमधील आदिवासी स्वातंत्र्य सैनिक बिरसा मुंडा यांना अभिवादन केले. बिरसा मुंडा यांच्या स्मरणार्थ व्हिडिओ कॉन्फरन्सिंगव्दारे संग्रहालयाचे उद्धाटन केले. भगवान बिरसा मुंडा स्वातंत्र्य सैनिक संग्रहालयासारखी देशात आणखी ९ संग्रहालय उभारणार असल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली.गुजरातमधील राजपिपला, मध्य प्रदेशातील छिंदवाडा, तेलंगणातील हैदराबाद, मणिपूरमधील तामिंगलाँग, मिझोराममधील केल्सी, आंध्र प्रदेशातील लंबासिंगी, छत्तीसगडमधील रायपूर, केरळमधील कोझिकोड, गोव्यातील पोंडा याठिकाणी अशी संग्रहालय उभारण्यात येतील.स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात आदिवासी संस्कृतीला जगभरात एक ओळख मिळावी. यासाठी १५ नोव्हेंबर हा भगवान बिरसा मुंडा यांची जयंती – ‘आदिवासी गौरव दिन’ म्हणून साजरा करण्याच निर्णय घेण्यात आला आहे.असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

- Advertisement -

या दिवशी आपल्या पूज्य अटलजींच्या प्रबळ इच्छाशक्तीमुळे झारखंड राज्यही अस्तित्वात आले.देशाच्या सरकारमध्ये स्वतंत्र आदिवासी मंत्रालय स्थापन करणारे आणि आदिवासी हित देशाच्या धोरणांशी जोडणारे अटलजी होते,असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट् करत अटल बिहारी वाजपेयींची आठवण काढली.

- Advertisement -

आदिवासी गौरव दिनानिमित्त आज भोपाळमध्ये आयोजित कार्यक्रमाला पंतप्रधान मोदींनी हजेरी लावली. यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात मोठी घोषणा केली. ते म्हणाले की, महात्मा गांधी, सरदार पटेल यांच्याप्रमाणे आतापासून देशात दरवर्षी बिरसा मुंडा जयंती साजरी केली जाईल. आपल्या भाषणात पीएम मोदींनी आदिवासी समाजाचे खूप कौतुक केले.

कोण होते ‘बिरसा मुंडा’

बिरसा मुंडा एक भारतीय आदिवासी क्रांतीकारक होते. ते आदिवासी समाजाचे वीर नायक होते. १९ व्या शतकातील शेवटच्या वर्षात मुंडा जमातीच्या आदिवासींकडून इंग्रज सरकारविरुद्ध जनआंदोलने केली, त्याचे नेतृत्व बिरसा मुंडा यांनी केले होते. भारतीय स्वातंत्र्य लढ्यात या आदिवासींच्या संग्रामास इतिहासात मोठे स्थान प्राप्त करून देण्याचे श्रेय बिरसा मुंडा यांनाच जाते.


हे ही वाचा – Babasaheb Purandare: शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे अनंतात विलीन, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -