घरदेश-विदेशममता बॅनर्जींच्या विरोधातील भाजपच्या महामोर्चाला हिंसक वळण; पोलिसांचा आंदोलकांवर लाठीचार्ज

ममता बॅनर्जींच्या विरोधातील भाजपच्या महामोर्चाला हिंसक वळण; पोलिसांचा आंदोलकांवर लाठीचार्ज

Subscribe

नवी दिल्ली: पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जी सरकारविरोधातील भाजपच्या महामोर्चाला आज हिंसक वळण लागल्याचे पाहायला मिळाले. यावेळी पोलीस आणि आंदोलनकर्त्यांमध्ये काही वेळ झटापट देखील झाली. पोलिसांनी गर्दी पांगवण्यासाठी आंदोलकांवर अश्रुधुरांच्या नळकांड्या फोडल्या आहेत. तसेच पाण्याचा मारही करण्यात आला आहे. या प्रकरणी शुभेंदू अधिकारी व लॉकेट चॅटर्जींसह अनेक भाजप नेते व कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

दरम्यान आंदोलकांकडून बडा बाजार पोलिस ठाण्याजवळ पोलिसांचे वाहन जाळण्याची घटना देखील घडली आहे. तृणमूल काँग्रेस सरकारच्या कथित भ्रष्टाचाराविरोधात भाजपने ‘नबान्ना अभियान’ सुरू केले. याअंतर्गत आज भाजपने राज्य सचिवालयावर मोर्चा काढला. यावेळी पोलिसांनी पश्चिम बंगाल विधानसभेतील विरोधी पक्षनेते शुभेंदू अधिकारी यांच्यासह अनेक समर्थकांना ताब्यात घेतले. तर भाजप प्रदेशाध्यक्ष सुकांतो मजमूदार यांनाही कोलकाता पोलिसांनी हावडा रेल्वे स्थानकावर ताब्यात घेतले आहे.

- Advertisement -

राणीगंज आणि बोलपूरमध्ये पोलिसांनी आंदोलक भाजप कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले, यावेळी पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाली. काही भाजप कार्यकर्त्यांनी शांतीपूरमध्य़े रेल्वेत पश्चिम बंगाल शिक्षक भरती घोटाळ्यातील आरोपी अर्पिता आणि पार्थ चॅटर्जी यांचे पोस्टर फडकावले होते. त्या पोस्टरवर चोर असे लिहिले होते. दरम्यान ममता बॅनर्जी आणि भाजप समर्थक आपापसात भिडल्याचे दिसले.

- Advertisement -

भाजपने नबान्न अभियानाअंतर्गत संपूर्ण नबान्नला 3 बाजूने घेरण्याची योजना आखली. हावडा रेल्वे स्थानकावर सुकातों मजमूदार, सांतरागाछीतून सुवेंदु अधिारी व स्कॉयडहून दिपील घोष हे नबान्नला जाणार होते. पण पोलिसांनी या तिघांनाही रोखले. नेत्यांच्या अटकेसाठी बंगाल पोलिसांनी स्पेशल फोर्स तैनात केली होती. हावडा ब्रिजलगत भाजप कार्यकार्त्यांना रोखण्यासाठी बंगाल पोलिसांनी द्विस्तरीय बॅरिकेडींग केले आहे.

नबान्न चलो अभियानात भाग घेण्यासाठी कोलकता येथे जाणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांना पोलीस रोखत आहेत. भाजपच्या नबन्ना चलो मोहिमेला पोलिसांनी परवानगी दिली नाही. असे असतानाही मोठ्यासंख्येने भाजप कार्यकर्ते ममता बॅनर्जी सरकारविरोधात रस्त्यावर उतरले आहेत.

पश्चिम बंगालमध्ये 14 सप्टेंबरपासून विधानसभेचे अधिवेशव सुरु होत आहे. यामुळे भाजप या मोर्चाच्या माध्यमातून बॅनर्जी सरकारला घेरत शक्तीप्रदर्शन करण्याचा प्रयत्न करत आहेत. यात भाजपकडून सत्ताधारी तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांवर भष्ट्राचाराचे आरोप केले जात आहे. या भ्रष्टाचारांच्या आरोपाखाली तृणमूलचे पार्थ चॅटर्जी व अनुव्रत मंडल हे दोन बडे नेते तुरुंगात आहेत.


अमृता फडणवीसांना फेक अकाऊंटवरून शिवीगाळ करणाऱ्या महिलेस ठाण्यातून अटक

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -