घरदेश-विदेशअमित शहांच्या प्रकृतीत सुधारणा, एम्समधून मिळाला डिस्चार्ज!

अमित शहांच्या प्रकृतीत सुधारणा, एम्समधून मिळाला डिस्चार्ज!

Subscribe

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहांच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे. त्यांना स्वाईन फ्लूची लागण झाली होती. शहांना एम्समधून डिस्चार्ज मिळाला आहे.

स्वाईन फ्लूची लागण झाल्यामुळे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहांवर एम्स रुग्णालयात उपचार सुरु होते. १६ जानेवारीला उपचारासाठी त्यांना एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. त्यानंतर आता त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली असून एम्लमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे.


हेही वाचा – अमित शहांना स्वाईन फ्ल्यू; एम्स रुग्णालयात उपचार सुरु

- Advertisement -

ट्विटरवर स्वाईन फ्लू झाल्याची दिली होती माहिती

अमित शहा यांना उपचारासाठी दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. एम्स रुग्णालयाचे वरिष्ठ चिकित्सक डॉ. रणदीप गुलेरिया यांच्या देखरेखित त्यांच्यावर उपचार सुरु होते. अमित शहा यांनी स्वत: आपल्याला स्वाईन फ्लू झाल्याची माहिती दिली होती. त्यांनी यासंबंधी ट्विट केले होते आणि म्हटले होते की, ‘मला स्वाईन फ्ल्यू झाला आहे. माझ्यावर उपचार सुरु आहे. ईश्वराच्या कृपेने, आपल्या सर्वांच्या प्रेम आणि शुभेच्छांनी मी लवकरच बरा होईल.’

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -