घरमुंबईमुंबई मॅरेथॉन संपन्न! केनियाचा कॉसमस लॅगट विजयी!

मुंबई मॅरेथॉन संपन्न! केनियाचा कॉसमस लॅगट विजयी!

Subscribe

केनियाचा कॉसमस लॅगट हा मुंबई मॅरेथॉन २०१९चा विजेता ठरला आहे.

केनियाचा कॉसमस लॅगट मुंबई मॅरेथॉन २०१९ चा विजेता ठरला आहे. तर महिला गटात इथियोपियाची अलेमू विजयी ठरली आहे. मॅरेथॉनच्या भारतीय गटात आर्मीचे नितेंद्र सिंग रावत विजयी ठरले आहेत. मुंबई मॅरेथॉनला आज सकाळी ५:४० वाजल्यापासून सुरुवात झाली. या मॅरेथॉनची मुख्य स्पर्धा ही ४२ किलोमीटरची होती. दरम्यान, २१ किलोमीटरच्या हाफ मॅरेथॉनमध्ये १४ हजार ४५७ धावपटूंनी सहभाग घेतला होता. हाफ मॅरेथॉनच्या पुरुष गटामध्ये श्रीणू मुगाता यांचा प्रथम क्रमांक आला आहे. तर करण थापा दूसरे आणि कालिदास हिरवे यांचा तिसरा क्रमांक आला आहे. हाफ मॅरेथॉनच्या महिला गटामध्ये मंजू यादव यांचा प्रथम क्रमांक आला. तर साईगिता नाईक यांनी दूसरा तर मिनू यांनी तिसरा क्रमांक पटकावला आहे.


दरवर्षीप्रमाणे यंदाही टाटा मुंबई मॅरेथॉनला सकाळपासून सुरुवात झाली. यावर्षी आयोजित केलेल्या मॅरेथॉनचं हे १६ वं वर्ष होतं. मॅरेथॉनमध्ये एकूण ४६ हजार ४१४ धावपटूंनी सहभाग घेतला. टाटा मुंबई मॅरेथॉनसाठी धावपटूंसह त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आलेल्या मुंबईकरांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळाले. सकाळी मोजक्या प्रवाशांसह धावणाऱ्या पश्चिम आणि मध्य रेल्वे आज मॅरेथॉनच्या निमित्ताने खचाखच भरुन धावत होत्या. काही हौशी कलाकारच नाही तर अगदी परदेशातून आलेले नागरिक ही मॅरेथॉनमध्ये सहभागी झालेल्या रनर्सला चिअर अप करण्यासाठी दाखल झाले. हेच चित्र दरवर्षीप्रमाणे यंदाही पाहायला मिळालं. फिटनेससाठी नियमित धावणाऱ्या लोकांचा उत्साह वाखणण्याजोगा असतो. तरुण-तरुणींपासून दिव्यांग, ज्येष्ठ मंडळींपर्यंत सर्वच वयोगटातील रनर्सचा या मॅरेथॉनमध्ये सहभाग दिसून आला.

- Advertisement -

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले फ्लॅग ऑफ

मुंबई मॅरेथॉनमध्ये अनेक दिग्गजांनी सहभाग घेतला. उद्योगपती अनिल अंबानींपासून भाजप काँग्रेसच्या नेतेमंडळींनी या मॅरेथॉनमध्ये सहभाग घेतला. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फ्लॅग ऑफ करुन ड्रीम रनची सुरुवात झाली.

- Advertisement -

मेरी कॉमने केले फ्लॅग ऑफ 

मेरी कॉमने फ्लॅग ऑफ करुन मुंबई मॅरेथॉनला सुरुवात झाली

दरम्यान, सकाळी ७ वाजून २० मुख्य मॅरेथॉनला सुरुवात झाली आहे. या मॅरेथॉनला मेरी कॉमने फ्लॅग ऑफ करुन सुरुवात झाली. या मॅरेथॉनमध्ये मुंबईकरांनी सर्वाधिक प्रमाणात सहभाग घेतला आहे. या मुख्य मॅरेथॉनचा मार्ग सीएसटी ते सीएसटी, व्हाया, फ्लोरा फाऊंटन-वानखेडे स्टेडिअम-बाबूलनाथ मंदिर-जसलोक हॉस्पिटल-महालक्ष्मी-वरळी सी लिंक-माहिम चर्च-सिद्धिविनायक मंदिर-नेहरु सायन्स सेंटर-सीएसटी असा असणार आहे.

 

मुंबई पोलीसांनी केले ट्वीट

दरम्यान, मॅरेथॉन स्पर्धेमुळे वाहतूक कोंडीची प्रश्न उद्भवू नये यासाठी मुंबई पोलीस कसून मेहनत घेत आहे. वाहतूक कोंडीमुळे मॅरेथॉन स्पर्धेत अडचण यायला नको आणि जे प्रवासी किंवा पर्यटक मुंबई फिरायला आले आहेत, त्यांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागू नये, म्हणून मुंबई पोलिसांनी रस्त्यांचे नकाशे ट्विट केले आहेत. या नकाशामध्ये सगळी माहिती दिलेली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -