घरदेश-विदेशपहिले राष्ट्र मग पक्ष; लालकृष्ण आडवाणींनी सोडले मौन

पहिले राष्ट्र मग पक्ष; लालकृष्ण आडवाणींनी सोडले मौन

Subscribe

गांधीनगरचे तिकीट कापले गेल्यानंतर भाजपचे ज्येष्ठ नेते यांनी आपले मौन सोडले आहे. 'नेशन फर्स्ट, पार्टी फर्स्ट, सेल्फ लास्ट', असे आडवाणी म्हणाले आहेत.

भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांनी ब्लॉग लिहूण आपले मौन सोडले आहे. या ब्लॉगमध्ये त्यांनी म्हटले आहे की, माझा जीवनाचा एक सिद्धांत आहे की – नेशन फर्स्ट, पार्टी फर्स्ट, सेल्फ लास्ट. मी प्रत्येक परिस्थितीत मी या सिद्धांताचे पालन केलेल आहे. यासोबतच ‘भाजपने सुरुवातीपासूनच राजकीय पक्षाला दुश्मन मानलेले नाही. याशिवाय जे राजकीय पक्ष भाजपच्या विचारांना सहमत नाहीत, त्यांना भाजपने देशद्रोही म्हटलेले नाही’, असं म्हणत आडवाणी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांना टोला लगावला आहे. यापुढे त्यांनी असंही लिहलं आहे की, ‘देशाच्या नागरिकाने कुठल्या पक्षाला स्वीकारावं. त्याबाबतचे स्वातंत्र्य नागरिकाला आहे. भाजप देखील या स्वातंत्र्याचा पुरस्कार करते.’ येत्या ६ एप्रिलला भाजप स्थापना दिवस आहे. या दिनाच्या पार्श्वभूमीवर आडवाणींनी हा ब्लॉग लिहिला आहे.

‘गांधीनगरच्या लोकांचा आभारी आहे’

लालकृष्ण आडवाणी १९९१ सालापासून गुजरातच्या गांधीनगर मतदारसंघातून निवडूण येत आहेत. परंतु, आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपकडून आडवाणी यांचे तिकीट कापले गेले आहे. आता अमित शहा या जागेवरुन निवडणूल लढवणार आहेत. दरम्यान, आपल्या ब्लॉगमध्ये लालकृष्ण आडवाणी यांनी गांधीनगरच्या मतदारांचे आभार मानले आहे. ते म्हणाले की, मी गांधीनगरच्या जनतेचा कृतज्ञ आहे. त्यांनी १९९१ नंतर सहा वेळा मला निवडूण आणले आहे. जनतेचं प्रेम आणि समर्थनमुळे मला नेहमी काम करण्याची प्रेरणा दिली आहे. मातृभूमीची सेवा करणं हाच माझा ध्यास आहे. गेल्या सात दशकांपासून मी भाजपसोबत पक्षात काम करत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -