घरदेश-विदेशभाजप खासदाराचे पाय धुवून कार्यकर्त्याने प्यायले पाणी

भाजप खासदाराचे पाय धुवून कार्यकर्त्याने प्यायले पाणी

Subscribe

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या भाजप खासदाराच्या व्हिडिओ चांगलाच ट्रोल होत आहे. यावर भाजप खासदाराने कार्यकर्ता स्वखुशीने पाय धुवत असेल तर त्यात काय वाईट आहे असे स्पष्टीकरण दिले आहे.

झारखंडचे भाजप खासदार निशिकांत दुबे सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ आणि फोटोमुळे चांगलेत ट्रोल होत आहेत. या व्हिडिओमध्ये दुबे यांच्या एका कार्यकर्त्यांने त्यांचे पाय धुवून पाणी पित असल्याचे समोर आले आहे. स्वत: निशिकांत दुबे यांनी याचा फोटो त्यांच्या फेसबुक अकाऊंटवर टाकला आहे. कार्यकर्त्यांकडून पाय धुवून घेणारे खासदार निशिंकात दुबे या व्हिडिओ आणि फोटोमुळे वादात सापडले आहेत. मात्र या आमदाराने यात काहीच चूक नसल्याचे सांगत याप्रकरणात राजकारण करु नका असे म्हटले आहे.

- Advertisement -

पाय धुवून प्यायले पाणी

भाजप खासदार निशिकांत दुबे रविवारी कनभारा येथे पुलाच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी आले होते. यावेळी भाजप कार्यकर्ता पंकज शाहने सांगितले की, आमदाराने पुल भेट देऊन जनतेवर खूप उपकार केले. त्यामुळे त्यांचे पाय धुवून पाणी पिण्याची मला इच्छा होत आहे. त्यानंतर पंकज शाहने थाळी आणि पाणी मागितले आणि निशिकांत दुबे यांचे पाय धुतले. आमदार निशिकांत दुबे यांनी देखील काहीच आक्षेप न घेता पाय धुवण्यासाठी पुढे केले. त्यानंतर पंकज शाहने तिर्थ घेतल्याप्रमाणे पाणी हातात घेऊन ते प्यायले आणि डोक्यावरुन फिरवले.

निशिकांत दुबेने दिले स्पष्टीकरण

हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. खासदार निशिकांत दुबे यांनी त्यांच्या फेसबुकवर वॉलवर फोटो पोस्ट केला. या फोटोमुळे ते अडचणीत येऊन त्यांच्यावर जोरदार टीका होऊ लागली. त्यानंतर निशिकांत दुबे यांनी फेसबुकवरुन स्पष्टीकरण दिले. त्यांनी पोस्टमध्ये सांगितले की, आपल्या माणसांमध्ये श्रेष्ठता वाटली जात नाही. जर कार्यकर्ता स्वखुशीने पाय धुवत असेल तर त्यात काय वाईट आहे? पंकज शाह यांनी जनतेसमोर बोलून दाखवले होते. त्यांच्या बोलण्याचा मी सन्मान केला. अतिथीचे पाय धुवण्याची झारखंडमध्ये परंपरा आहे. सर्व कार्यक्रमात आदिवासी महिला हे करत नाही का? याला राजकिय रंग का दिला जातोय. अतिथिचे पाय धुणे चूक आहे का, आपल्या पूर्वजांना विचारा, महाभारतात कृष्णाने पाय का धुतले नव्हते? चूकीच्या मानसिकतेवर धिक्कार असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -