घरदेश-विदेशराहुल गांधींच्या प्रश्नावर भाजपचा पलटवार

राहुल गांधींच्या प्रश्नावर भाजपचा पलटवार

Subscribe

चीनच्या मुद्द्यावरुन राजकीय वर्तुळात चकमक

पूर्व लडाखमधील एलएसीवरून भारत आणि चीनमधील संघर्ष सुरू झाल्यापासून कॉंग्रेसचे खासदार राहुल गांधी केंद्रातील मोदी सरकारला सतत प्रश्न विचारत आहेत. गलवान खोऱ्यात भारत-चिनी सैनिकांमध्ये झालेल्या रक्तरंजित चकमकीनंतर राहुल गांधींनी केंद्र सरकारला लक्ष्य केलं आहे. पण आता भाजपने प्रत्युत्तर देऊन संपूर्ण कॉंग्रेस पक्षाला प्रश्नांच्या वर्तुळात उभं केलं आहे. यावेळी राहुल गांधींनी देशाची दिशाभूल करण्याच्या राजकारणापासून दूर रहावं, असं भाजपने म्हटलं आहे.

राहुल यांनी सोशल नेटवर्किंग साइट ट्विटरवर व्हिडिओ प्रसिद्ध करत म्हटलं आहे की, “मला हे विचारायचं आहे की शहीद वीरांना शस्त्राशिवाय कोणी पाठवलं आणि का? याला जबाबदार कोण?” लडाख सीमेवर काय चालले आहे याची माहिती केंद्राने द्यायला हवी, असं राहुल गांधी यांनी काल ट्विट करत म्हटलं होतं.

- Advertisement -

यावर भाजप नेते संबित पात्रा यांनी राहुल गांधी यांच्यावर जोरदार हल्ला केला. राहूल गांधींना कॉंग्रेसच्या काळात चीनबरोबर झालेल्या कराराविषयी वाचण्याचा सल्ला देण्यात आला आहे. १९९६ मध्ये चीनबरोबर झालेल्या कराराबद्दल बोलताना संबित पात्रा म्हणाले, “जर आपण अशिक्षित असल्यास, आपल्याला काही माहित नसल्यास लॉकडाऊनमध्ये घरी बसून काही पुस्तके वाचायला हवी होती. कॉंग्रेसच्या कारकिर्दीत चीनबरोबर काय करार झाले आहेत हे तुम्ही वाचलं पाहिजे. या करारावर निर्णय घेण्यात आला आहे की दोघांकडून कोणतीही गोळीबार केला जाणार नाही, स्फोटकांचा वापर होणार नाही, तसेच सैनिक शस्त्रे घेऊन सज्ज होणार नाहीत.” शुक्रवारी चीनच्या विषयावर सर्वपक्षीय बैठक आहे. अशा परिस्थितीत राहुल गांधींनी वाट पाहायला हवी होती, असं संबित पात्रा म्हणाले.


हेही वाचा – उद्योग जगताला इतिहास बदलण्याची संधी, देशाला आत्मनिर्भर बनवा – पंतप्रधान मोदी

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -