घरताज्या घडामोडीउद्योग जगताला इतिहास बदलण्याची संधी, देशाला आत्मनिर्भर बनवा - पंतप्रधान मोदी

उद्योग जगताला इतिहास बदलण्याची संधी, देशाला आत्मनिर्भर बनवा – पंतप्रधान मोदी

Subscribe

खासगी क्षेत्रासाठी ४१ कोळसा खाणींचा लिलाव सुरू

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आत्मनिर्भर भारत अभियानांतर्गत खासगी क्षेत्रासाठी ४१ कोळसा खाणींच्या लिलावाची प्रक्रिया सुरू केली. या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की भारत कोरोनाशी लढा देईल आणि जिंकणार. भारत ही मोठी आपत्ती एका संधीमध्ये बदलेल. या संकटाने भारताला आत्मनिर्भर भारत होण्याचा धडा शिकविला आहे. उद्योग जगताला इतिहास बदलण्याची संधी असून देशाला आत्मनिर्भर बनवा, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की आत्मनिर्भर भारत म्हणजेच भारत आयातीवरील आपलं अवलंबन कमी करेल. खर्च कमी करणार आहे. आत्मनिर्भर भारत म्हणजे भारत लाखो कोटी रुपयांच्या परकीय चलनाची बचत करेल. आत्मनिर्भर भारत याचा अर्थ असा आहे की भारताला आयात करण्याची गरज नाही, यासाठी तो आपल्या देशात साधन आणि संसाधने विकसित करेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, ऊर्जा क्षेत्रामध्ये भारत आत्मनिर्भर होण्यासाठी आज एक मोठं पाऊल उचलत आहे. एका महिन्यात, प्रत्येक घोषणांवर, प्रत्येक सुधारणांवर कृषी क्षेत्रातल्या असोत, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रातील असोत किंवा आता कोळसा आणि खाण क्षेत्रातील, जलद गतीने काम करत आहोत.

- Advertisement -

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, या आपत्तीला संधीमध्ये बदलण्यासाठी भारत किती गंभीर आहे हे दाखवतं. आज आम्ही केवळ खासगी क्षेत्रातील कोळसा खाणींसाठी लिलाव सुरू करत नाही तर कित्येक दशकांपासून लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या कोळसा क्षेत्राला बाहेर आणत आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की मजबूत खनन आणि खनिज क्षेत्राशिवाय आत्मनिर्भर भारत शक्य नाही, कारण खनिज आणि उत्खनन हे आपल्या अर्थव्यवस्थेचे महत्त्वाचे आधारस्तंभ आहेत. या सुधारणांनंतर आता कोळसा उत्पादन, संपूर्ण कोळसा क्षेत्रही एक प्रकारे आत्मनिर्भर होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, देशात असे १६ जिल्हे आहेत जिथे कोळशाचे प्रचंड साठे आहेत, परंतु तेथील जनतेला त्यांना इतका फायदा झाला नाही. या कोळसा खाणींमुळे या लोकांना रोजगार मिळेल व तेथील रहिवाशांना अधिक सुविधा मिळतील.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -