घरताज्या घडामोडीमुख्यमंत्र्यांच्या धाडसामुळेच ८६२ कोरोना मृत्यूंची नोंद- पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल

मुख्यमंत्र्यांच्या धाडसामुळेच ८६२ कोरोना मृत्यूंची नोंद- पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल

Subscribe

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यातील मुंबईकरांप्रती असलेला प्रामाणिकपणा आणि धाडस यामुळेच मला चार दिवसात नोंद नसलेल्या ८६२ कोरोना मृत्यूंचे विश्लेषण करता आले अशी कबुली मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी ‘आपल महानगर’शी बोलताना दिली. एका खासगी रु्ग्णालयात एकाच दिवशी १६ मृत्यू झाल्ायची माहिती मला आकडेवारीवरून दिसली. ६ जूनच्या त्या आकडेवारीमध्ये काहीतरी गडबड असल्याचे माझ्या लक्षात आले. त्यानंतर सहआयुक्त आशुतोष सलिल आणि अतिरिक्त् आयुक्त सुरेश काकाणी यांच्या सोबत माहिती घेतली असता त्या खासगी रु्ग्णालयात ६ जून रोजी एकच मृत्यू झाला होता. मात्र दाखवण्यात आलेले मृत्यू अगोदरच्या काळातील होते हे मला दोघांकडून समजले.

याबद्दल अधिक चौकशी केली असता एका रुग्णालयात मृतदेहांची नोंद करण्यात असा गोंधळ होत असेल तर मुंबईतील इतरही खासगी रु्ग्णालयात असाच आकडेवारीचा गोंधळ असू शकतो अशी खात्री झाली. यामुळे मुंबईतील विविध खासगी रुग्णांलयामध्ये अजून किती मृत्यूची नोंद शिल्लक असेल हे जाणून घेण्यासाठी ८ जून रोजी तात्काळ आदेश काढत मुंबईतील सर्व खासगी आणि पालिकेच्या रु्ग्णालयांनाही ४८ तासाच्या आत त्यांच्या रु्ग्णालयात आतापर्यंत झालेल्या कोरोना मृत्यूची माहिती सादर करण्याचे आदेश दिले. ८ जून रोजी दिलेल्या आदेशानंतर मुंबई महापालिकेकडे हळूहळू कोरोना मृत्यूंची नोंद नसलेली आकडेवारी येऊ लागली अशी कबूली चहल यांनी दिली.

- Advertisement -

ही आकडेवारी बघून सुरुवातीला मला धक्काच बसला. एवढे झालेले मृत्यू मुंबई महापालिकेकडे नोंद नसल्याने समोर आले नव्हते. १२ जून रोजी १३८ कोरोना मृत्यू , १३ जून रोजी ४६७, १४ जून रोजी १५६, आणि १५ जून रोजी १०१ असे मिळून नोंद न झालेले मृत्यू हे कोरोना मृत्यू असल्याचे समोर आले. ११ जून ते १५ जून पर्यंत मुंबईच्या डेथ ऑडीट कमिटीने त्यांच्याकडे आलेल्या मृत्यूंची कारणमीमांसा करत १५ जूनला सायंकाळी सर्व रु्ग्णालयांकडून आलेल्या माहितीच्या आधारे ८६२ मृत्यू हे कोरोना मृत्यू असल्याचे स्पष्ट केले. तोपर्यंत एवढ्या मोठ्या प्रमाणात आमच्याकडे कोरोना मृत्यूंची माहिती नव्हती हे खरे आहे. असेही चहल म्हणाले. मुंबईचा पालिका आयुक्त म्हणून कारभार पारदर्शक असावा ही माझी ८ जूनपासून आयुक्तपदाचा पदभार सांभाळल्ायपासूनचीच भूमिका आहे . आयुक्त म्हणून मला काहीही लपवायचे नव्हते. जी मृत्यूंची माहिती आमच्याकडे रु्गणालयांकडून आलीच नाही ती आल्यानंतर ती गोष्ट बाजूला सारणे हे मनाला पटत नसल्याने १५ जूनला रात्री नऊ वाजता मुख्यसचिव अजोय मेहता यांना कल्पना दिली आणि राज्य सरकारला नोंद न झालेल्या ८६२ मृत्यूंबाबत मार्गदर्शन करावे असे पत्र लिहल्याचा दावाही चहल यांनी केला.

८६२ कोरना मृत्यूचा आकडा फार मोठा होता. त्यामुळे राज्य सरकारपुढे तीन पर्याय होते. कोरोना हा आजार महामारीमध्ये येत असल्याने एकतर राज्यसरकार या प्रकरणावर चौकशी करण्यासाठी समिती नेमू शकली असती , दुसरे म्हणजे केंद्र सरकारशी पत्र व्यवहार करून काय करावे असे सांगून वेळ काढू शकली असती, तसेच नोंद न झालेले ८६२ मृत्यू कोरोना मृत्यू असल्याचे जाहीर करणे हे पर्याय होते. मात्र मी पुन्हा एकदा स्पष्ट करतो की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मला कोणतीही गोष्ट लपवायची नाही. जे झालं असेल ते खरे व प्रामाणिकपणे सांगा असे आदेश मुख्य सचिव अजोय मेहता आणि आयुक्त म्हणून मला दिल्याने आम्ही काहीही न लपवता १६ जूनलाच ८६२ कोरोनाने मृत्यू झाल्याच्या माहितीचे पत्रक प्रसिद्ध केले.

- Advertisement -

डेथ ऑडीट कमिटीपुढे मुंबईतील कोरोना मृत्यूची माहिती वेळेत न आल्याची अनेक कारणे असतील. कोरोनाच्या काळात डॉक्टर व वैद्यकिय कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण झाली, क्वारंनटाईन व्हावे लागले. त्यामुळे अपुऱ्या कर्मचाऱ्यांवरच कामाचा ताण पडला असल्ायची शक्यता आहे. माझ्यापुढे जे आले ती माहिती आम्ही सार्वजनिक केली आहे. एखाद्या महामारीचा उद्रेक होणे अशी घटना शतकातून एकदाच होत असते. ही फार मोठी घटना असते. यामुळे या महामारीला कसे तोंड द्यावे याबद्द्ल आपण सगळे जण अन्नभिन्न असतो. मुंबईतील व राज्यातील इतर महापालिकेत कोरोना मृत्यू नोंदणीचा प्रकार घडला तसाच प्रकार इतर राज्यांमध्येही घडला असल्याची शक्यता आहे असेही ते म्हणाले. कोरोनाने तर आपला देश व सारे जग हादरवून टाकले आहे. मोठमोठ्या देशांमध्ये उपचाराची यंत्रणा आहे. मुंबई महापालिकाही आवश्यक त्या सुधारणा करत असून कोरोनाला रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. दिसत असलेली आकडेवारी ही प्रत्यक्षात १७ मार्च पासूनची असून मीच त्याचे गांभार्य ओळखून पाठपुरावा केल्याने हा प्रकार उघडकीस आल्याचा दावाही चहल यांनी केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -