घरताज्या घडामोडीBoiler Blast : मुजफ्फरपूरमध्ये बॉयलरच्या स्फोटात सहा मजूर जागीच ठार ; अनेक...

Boiler Blast : मुजफ्फरपूरमध्ये बॉयलरच्या स्फोटात सहा मजूर जागीच ठार ; अनेक जण जखमी

Subscribe

बिहारच्या मुझफ्फरपूर भागात भीषण स्फोट झाला असून,यामध्ये सहा मजूर ठार झाल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना मुजफ्फरपूर भागातील बेला औद्योगिक परिसरात एका कुरकुरे आणि न्यूडल्सच्या कारखान्यातील आहे. माहितीनुसार, रोजच्याप्रमाणे रविवारी सकाळच्या सुमारास कंपनीमध्ये काही मजूर काम करत होते. या दरम्यान, कारखान्यातील केमिकलची टाकी म्हणजेच बॉयलरचा मोठा स्फोट झाला.बॉयलरच्या स्फोटामुळे कारखान्याच्या परिसरात खळबळ उडाली आहे. या स्फोटाच्या भीषण आवाजामुळे स्थानिकांमध्येही भीतीचे वातावरण पाहायला मिळत आहे.
या स्फोटात अनेक मजूर जखमी झाले असून, जखमींचा आकडा अद्यापही स्पष्ट झालेला नाही. त्यामुळे घटनास्थळी रेस्क्यू ऑपरेशन सुरु आहे.

- Advertisement -

मुझफ्फरपूरमधील या कारखान्याच्या स्फोटामुळे या कारखान्यालगत असणाऱ्या कारखान्यांची मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे. ही घटना सकाळी ९ वाजून १५ मिनिटांनी घडल्याची माहिती समोर येत आहे. स्फोटाची माहिती समजताच, डीएम प्रणव कुमार आणि एसएसपी जयंतकाका यांनी घटनास्थळी जाऊन चौकशी केली. मिळालेल्या माहितीनुसार, बॉयलरचा स्फोट इतका जोरात होता की, त्याच्या आवाजाची तीव्रचा ५ किलोमीटरपर्यंत पोहचली.

घटनेची माहिती मिळताच बचावकार्य सुरु झाले आहे.घटनास्थळी ५ फायर बिग्रेडच्या गाड्या पोहचल्या.घटनेमध्ये जीव गमावलेल्या मृत मजूरांची ओळख पटण्यासाठी आणि गंभीररित्या जखमी झालेल्या मजूरांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

- Advertisement -

हे ही वाचा :- विराटची रविचंद्रन अश्विनसोबत संघातील वर्तणूक अयोग्य, पाकिस्तानच्या दिग्गज खेळाडूचा आरोप


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -