घरताज्या घडामोडीPakistan : ग्वादर शहरात बॉम्बस्फोट, चीनचे ८ इंजिनिअर ठार

Pakistan : ग्वादर शहरात बॉम्बस्फोट, चीनचे ८ इंजिनिअर ठार

Subscribe

हल्ल्यामागे तालिबान्यांचा हात असल्याचा संशय, कोणत्याही संघटनेने हल्ल्याची जबाबदारी स्विकारलेली नाही

पाकिस्तानमधील बलुचीस्तान प्रांतातील ग्वादर शहरात मोठा बॉम्बस्फोट झाल्याची माहिती हाती आली आहे. या स्फोटात चीनच्या ८ इंजिनिअर्सचा मृत्यू झाला. या हल्ल्यात तालिबान्यांचा हात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

पाकिस्तानच्या बलुचीस्तान प्रांतामधील ग्वादर शहरात ही घटना घडली. पाकिस्तानात कार्यरत चिनी इंजिनिअर्स पुन्हा एकदा बॉम्ब हल्ल्याचे लक्ष्य ठरले आहेत. यापूर्वी १४ जुलैला कोहिस्तान जिल्ह्यात दासु भागात अशाच एका हल्ल्यात १३ जणांचा बळी गेला होता. त्यात चीनच्या ९ इंजिनीअर्सचा समावेश होता. पाकिस्तानने त्या स्फोटाला बसमधील तांत्रिक बिघाडाचे कारण पुढे करत घटनेवर पांघरूण घालण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्यानंतर लगेचच भारतावर आरोप केला होता. मात्र, आता आजच्या घटनेने दहशतवादी हालचालींना दुजोरा दिला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -