घरCORONA UPDATEMaharashtra Corona Update: दिवसभरात ४ हजार नवे कोरोनाबाधित, १०५ रुग्णांचा मृत्यू

Maharashtra Corona Update: दिवसभरात ४ हजार नवे कोरोनाबाधित, १०५ रुग्णांचा मृत्यू

Subscribe

राज्यातील मृत्यू दर २.११ टक्क्यांवर आला आहे.

राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या गेल्या अनेक दिवसांपासून कमी होताना दिसत आहे. मात्र नव्या कोरोना बाधितांच्या संख्येत चढ उतार पहायला मिळत आहे. आज शुक्रवारी राज्यात ४ हजार ३६५ नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर राज्यात १०५ रुग्णांनी कोरोनामुळे जीव गमावला आहे. राज्यातील मृत्यू दर २.११ टक्क्यांवर आला आहे. राज्यात लसीकरणाला सुरूवात झाल्यापासून लसीकरणाला मोठा प्रतिसाद मिळत आहे. मुंबई,पुणे,नाशिक, नागपूर सारख्या महत्त्वाच्या ठिकाणी  कोरोना रुग्णांची संख्या कमी होताना दिसत आहे.मात्र कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना सतत काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. (4,000 new corona Positive patients registered in state, 105 patients died)

- Advertisement -

राज्यात कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांचा विचार केला असता आज राज्यात ६ हजार ३८४ रुग्ण बरे होऊन सुखरुप घरी परतले आहेत. राज्यातील आतापर्यंत कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांचा विचार केला असता राज्यात आतापर्यंत ६२ लाख २१ हजार ३०५ बाधित रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाणे मागील काही महिन्यांपासून वाढत आहे. सध्या राज्याचा रिकव्हरी रेट हा ९६.९७ इतका झाला आहे.

राज्यात आतापर्यंत तपासण्यात आलेल्या ५ कोटी १९ लाख २१ हजार ७९८ चाचण्यांपैकी ६४ लाख १५ हजार ९३५ चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत. राज्यात सध्या ३ लाख २२ हजार २२१ रुग्ण होम क्वारंटाईन असून २ हजार ७४५ रुग्ण हे संस्थात्मक क्वारंटाईन आहेत.

- Advertisement -

 


हेही वाचा – तिसर्‍या लाटेचा धोका निर्माण करण्यास भाजप जबाबदार – नवाब मलिक

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -