घरदेश-विदेशबोम्मईंचा आता महाराष्ट्रातील विरोधी पक्षावर निशाणा; म्हणाले, नेत्यांचं मानसिक संतुलन बिघडलंय!

बोम्मईंचा आता महाराष्ट्रातील विरोधी पक्षावर निशाणा; म्हणाले, नेत्यांचं मानसिक संतुलन बिघडलंय!

Subscribe

Basavraj Bommai | याआधी एनसीपी नेत्यांनीही या मुद्द्यावरून राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न केला होता, परंतु, प्रयत्न सफल होऊ शकला नाही,' असं बसवराज बोम्मई म्हणाले.

बेळगाव – महाराष्ट्र-कर्नाटकप्रश्नी सातत्याने वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी आता महाराष्ट्राच्या विरोधी पक्षनेत्यांवर निशाणा साधला आहे. महाराष्ट्रातील विरोधी पक्षाच्या नेत्यांचं मानसिक संतुलन बिघडलं आहे, असं बसवराज बोम्मई म्हणाले.

‘सभागृहाच्या आत आणि बाहेर महाराष्ट्र राज्य विधानसभेचे विरोधी पक्ष नेत्यांच्या वक्तव्यांवरून असं वाटतंय की त्यांचं मानसिक संतुलन बिघडलं आहे. याआधी एनसीपी नेत्यांनीही या मुद्द्यावरून राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न केला होता, परंतु, प्रयत्न सफल होऊ शकला नाही,’ असं बसवराज बोम्मई म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा बोम्मईंनी पुन्हा डिवचलं! एक इंचही जमीन महाराष्ट्राला देणार नाही, कर्नाटक विधानसभेत ठराव मंजूर

या वादात फक्त विरोधी पक्षानेच भाग घेतल्याचाही दावा बोम्मई यांनी केला आहे. दोन्ही राज्यातील लोकांमधील संबंध चांगले आहेत. दोन्ही राज्यात व्यापार सुरू आहे. प्रवास सुरू आहे. पण काही नेते कर्नाटकात प्रवेश करून लोकांना भडकवण्याचं काम करत आहेत. लोकांचं समर्थन मिळत नसल्याने त्यांनी पक्षाचा झेंडा आणून मोर्चा काढला. यावरून असं स्पष्ट दिसतंय की विरोधी पक्षाचे नेते आणि पदाधिकाऱ्यांनीच या मोर्चात सहभाग घेतला आहे. तसंच, हा वाद केवळ राजकीय उद्देषाने प्रेरित असल्याचंही ते म्हणाले.

- Advertisement -

दोन दिवसांपूर्वी त्यांनी एक इंच जमीनही महाराष्ट्राला देणार नाही, असं म्हणत विधानसभेत ठराव मंजूर करण्याच्या सूचना बोम्मई यांनी दिल्या होत्या. यावरून त्यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राला डिवचलं होतं. आता त्यांनी थेट विरोधी पक्षांवर निशाणा  साधला आहे. महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद चिघळण्याचं काम महाराष्ट्रातील विरोधी पक्षाने केल्याचा दावा बोम्मई यांच्याकडून केला गेला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील विरोधी पक्षनेते आता यावर काय प्रत्युत्तर देतात हे पाहावं लागेल.

विधानसभेत पडसाद

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद सुरू झाल्यापासून दोन्ही राज्यांमध्ये राजकीय लढाई सुरू आहे. याचे पडसाद विधानसभेतही उमटले. महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी ठोस भूमिका घ्यावी, अशी विनंती विरोधकांनी केली आहे. तसंच, गृहमंत्र्यांच्या बैठकीत नेमकं काय ठरलं याची माहिती सार्वजनिक करण्याची मागणी विरोधकांकडून करण्यात येत आहे.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -