घरटेक-वेकJioPhone Next: जगातील सर्वात स्वस्त 4G स्मार्टफोन; ५०० रुपयांपेक्षा कमी किंमतीत करा...

JioPhone Next: जगातील सर्वात स्वस्त 4G स्मार्टफोन; ५०० रुपयांपेक्षा कमी किंमतीत करा बुक!

Subscribe

रिलायन्सने जूनमध्ये जिओफोन नेक्स्ट स्मार्टफोनची घोषणा केली होती, ज्या फोनची विक्री १० सप्टेंबरपासून सुरू होणार असे म्हटले जात आहे. सर्वसामान्यांना परवडणारा हा 4G स्मार्टफोन असणार आहे. मात्र, अद्याप कंपनीने त्याची किंमत जाहीर केलेली नाही. हा फोन गुगलच्या भागीदारीत विकसित करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रिलायन्सने पाच लोकप्रिय बँकांशी भागीदारी केल्याने हा फोन सहज वापरता येणार आहे. याद्वारे कंपनी आपल्या जिओफोन नेक्स्ट स्मार्टफोन ग्राहकांना अनेक ऑफर्स देण्याची योजनादेखील आखत आहे.

दरम्यान, रिलायन्स पाच बॅंकांसह भागीदारी करत आहे जेणेकरून प्रत्येकापर्यंत हा परवडणारा 4G मोबाईल फोन पोहोचू शकेल. या अंतर्गत ग्राहक फक्त १० टक्के पैसे देऊन JioPhone Next 4G फोन खरेदी करू शकतील. या बॅंकांमध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय), पिरामल कॅपिटल, आयडीएफसी फर्स्ट अॅश्योरसह पाचही बँकांनी १० हजार कोटी रुपयांच्या व्यवसायाचे आश्वासन दिले आहे. याशिवाय, चार नॉन-बँकिंग फायनान्स कंपन्यांनी २ हजार ५०० कोटी रुपयांच्या क्रेडिट सपोर्टचे आश्वासन दिले आहे. एका रिपोर्टनुसार, पुढील आठवड्यापासून JioPhone Next ची प्री-बुकिंग भारतात सुरू होणार आहे. तसेच असेही सांगितले जात आहे की, JioPhone Next ची किंमत ३ हजार ४९९ रुपये असणार आहे. अशा परिस्थितीत, हा फोन ५ हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत लॉन्च झाला, तर तुम्ही हा फोन ५०० रुपयांपेक्षा कमी किंमतीत बुक करू शकणार आहात.

- Advertisement -

JioPhone Next फोन हा Android 11 वर आधारलेला असू शकतो. यामध्ये ५.५ इंचाचा HD + डिस्प्ले याशिवाय हा फोन Qualcomm QM215 प्रोसेसरने सुसज्ज असणार आहे. ज्यामध्ये २ जीबी किंवा ३ जीबी रॅम मिळू शकणार आहे. तसेच या फोनमध्ये १६ जीबी किंवा ३२ जीबी ईएमएमसी ४.५ स्टोरेज दिले जाऊ शकते. फोटोग्राफीसाठी फोनमध्ये १३ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आणि ८ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा दिला जाऊ शकतो. JioPhone Next 4G VoLTE सपोर्टसह ड्युअल-सिम सपोर्ट उपलब्ध होऊ शकतो. यासह फोनची बॅटरी 2,500 mAh दिली जाऊ शकते.


कार्यक्रम ठरल्याने चौकशीला हजर राहू शकत नाही, अनिल परबांनी ईडीकडे मागितला १४ दिवसांचा वेळ

 

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -