कार्यक्रम ठरल्याने चौकशीला हजर राहू शकत नाही, अनिल परबांनी ईडीकडे मागितला १४ दिवसांचा वेळ

ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्यासाठी अनिल परब यांनी ईडीकडे १४ दिवसांचा वेळ मागितला

shivsena leader anil parab said shivsena will win in BMC Election 2022

राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब (anil Parab) यांनी मनी लाँड्रिंग प्रकरणी रविवारी ईडीकडून (ED) नोटीस बजावण्यात आली. आज म्हणजेच मंगळवारी सकाळी ११ वाजता अनिल परब यांना मुंबईतील ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यामुळे आज अनिल परब ईडी चौकशीसाठी जाणार का याकडे सर्वांचे लक्ष होते मात्र अनिल परब यांनी ईडीला हुलकावणी देत चौकशीसाठी गैरहजर राहिले. (Anil Parab was absent for ED inquiry today)  ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्यासाठी अनिल परब यांनी ईडीकडे १४ दिवसांचा वेळ मागितला आहे. तसेच मंत्री असल्यामुळे आजचे कार्यक्रम अगोदरच ठरले असून ते रद्द करता येणार नसल्याचे पत्र लिहून अनिल परब यांनी ईडीला कळवले. ईडीने परब यांचे पत्र स्वीकारले असून अनिल परब यांना वेळ द्यायचा की, त्यांना दुसरे समन्स काढायचे याचा विचार ईडीचे अधिकारी करत असल्याची माहिती समोर येत आहेत.

 

ईडीने रविवारी अनिल परब यांना बजावलेल्या नोटीसमध्ये इन्व्हेस्टिगेशन पार्ट इतकेच नमूद केले होते. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप मुंबई तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केला होता. याची चौकशी सीबीआयकडून सुरू होती. या चौकशीतंर्गत अनिल देशमुख यांचे स्वीय सचिव पलांडे आणि स्वीय सहाय्यक कुंदन शिंदे यांना ईडीने अटक केली. त्याच पार्श्वभूमीवर पुढील तपासाठी परिवहन मंत्री अनिल देशमुख यांनी ईडीने समन्स बजावले आहेत.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जन आशीर्वाद यात्रेत त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या विरोधात केलेल्या आक्षेपार्ह विधानामुळे राणेंचा अटक करण्यात आली त्यानंर परिवहन मंत्री तसेच रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब हे एका नियोजित बैठकीत नारायण राणे यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना फोनवरुन एका व्यक्तीला देत असतानाची एक व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली आणि अनिल परब चांगलेच चर्चेत आले. या प्रकरणानंतर भाजपने अनिल परब यांच्यावर कारवाई करुन सीबीआय चौकशी करण्यासाठी कोर्टात जाणार असल्याचे जाहीर केले.


हेही वाचा – अनिल परबांच्या अडचणी वाढणार? परिवहन खात्यातील पदोन्नतीमधील कथीत भ्रष्टाचाराची चौकशी होणार