घरदेश-विदेशBooster shots : अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी घेतला Covid-19 विरोधी 'बूस्टर...

Booster shots : अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी घेतला Covid-19 विरोधी ‘बूस्टर डोस’

Subscribe

जगभरात कोरोना विषाणूचा प्रसार अत्यंत वेगाने झाला. आत्तापर्यंत जगातील २३ कोटीहून अधिक नागरिक या कोरोना महामारीच्या संपर्कात आले. त्यामुळे सर्वाधिक देशांमध्ये आता कोरोनाविरोधी लसीकरण मोहिमेला वेगाने सुरुवात झाली आहे. कोरोना विषाणूपासून वाचण्यासाठी लसीकरण हा एकमेव उपाय आत्ता जगासमोर उरला आहे. त्यामुळे अमेरिकेतही सर्वाधिक नागरिकांना कोरोनाविरोधी लस देण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरु आहे. अशातच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन (joe biden) यांनी COVID-19 विरोधी  लसीचे दोन डोस पूर्ण झाल्यानंतर सोमवारी ‘बूस्टर डोस’ (Booster shots) घेतला आहे.

व्हाईट हाऊसमधील माहितीनुसार, (White House )अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी व्हाइट हाऊसमध्येच COVID-19 विरोधी लसीचा ‘बूस्टर डोस’ घेतला आहे. फेडरल हेल्थ अधिकाऱ्यांकडून बूस्टर डोसला मंजुरी मिळाल्यानंतर बायडेन यांनी फाइजर लसीचा तिसरा डोस म्हणजेच बूस्टर डोस घेतला आहे.

- Advertisement -

बूस्टर डोस घेण्यापूर्वी बायडेन यांनी सांगितले की, “आपणास माहित आहे की, या कोरोना महामारीला हरवण्यासाठी आणि वाचण्यासाठी, आपल्या मुलांना सुरक्षित ठेवण्यासाठी, शाळा सुरु करण्यासाठी आणि आपली अर्थव्यवस्था सुरळीत चालवण्यासाठी आपणा सर्वांना लस घेणे गरजेचे आहे.”

- Advertisement -

अमेरिकन नागरिकांना लस घेण्यासाठी केले आवाहन

राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी याचवर्षी जानेवारी महिन्यात कोरोनाविरोधी लसीचा दुसरा डोस घेतला होता. लस घेतल्यानंतर त्यांनी नागरिकांनाही आवाहन करत सांगितले की, “कृपया चांगल काम करा, कृपया लस घ्या, कारण हीच लस आपले आणि आपल्या आजूबाजूच्या नागरिकांचे जीवन वाचवू शकते.”

बायडेन यांनी बूस्टर डोसवर बोलताना सांगितले की, “बूस्टर डोस गरजेचा आहे. पण याआधी सर्वाधिक नागरिकांचे लसीकरण पूर्ण करणे महत्त्वाचे आहे. अमेरिकेतील नागरिक योग्य दिशेने काम करतायत. ७७ टक्के वयस्कर अमेरिकन नागरिकांना लसीचा किमान एक डोस घेतला आहे. तर अजून २३ टक्के नागरिकांनी लसीचा एकही डोस घेतला नाही.” असेही ते म्हणाले.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -