घरदेश-विदेशब्राझीलने मानले भारताचे आभार.. राष्ट्राध्यक्षांनी हनुमानाचा फोटो केला ट्विट

ब्राझीलने मानले भारताचे आभार.. राष्ट्राध्यक्षांनी हनुमानाचा फोटो केला ट्विट

Subscribe

भारताने कोरोना लसीची २० लाख डोस ब्राझीलला दिल्याने ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांनी भारताचे अनोख्या पद्धतीने आभार मानले आहेत.

भारताने कोरोना लसीचे २० लाख डोस ब्राझीलला दिले आहेत. जगभरात कोरोना संसर्गाने हाहाकार घातला आहे. सर्वच देशात कोरोना लस उपलब्ध झाली असून कोरोना लसीकरण सुरु केला आहे. भारताने कोरोना लसीची २० लाख डोस ब्राझीलला दिल्याने ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांनी भारताचे अनोख्या पद्धतीने आभार मानले आहेत. ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांनी हनुमानाचा संजीवनी बूटी घेऊन जातानाचा फोटो ट्विट करुन भारताचे आभार व्यक्त केले आहेत. भारतातून मित्रराष्ट्रांना कोरोना लस देण्यात येत आहे. कोरोना काळात अनेक देशांना भारताने हाइड्रोक्सीक्लोरोक्वीन टॅबलेट्सही दिल्या होत्या. भारताने आतापर्यंत मॉरीशस, म्यांमार, भूटान, मालदीव, बांग्लादेश आणि नेपाल या देशांना कोरोनाचे लसीचे डोस पाठविले आहेत.

काय म्हटले ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष

भारताने कोरोना लसीचे डोस पाठवल्यानंतर ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांनी भारताचे आभार व्यक्त केले आहेत. ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांनी ट्विट करत असे म्हटले आहे की, जागतिक अडथळा दूर करण्याच्या प्रयत्नांमध्ये मोठा भागीदार मिळाल्याचा ब्राझीलला आनंद आहे. ब्राझिलसाठी कोरोना लस भारतातून निर्यात करुन आम्हाला मदत केल्याबद्दल धन्यवाद. तसेच हिंदी भाषेत ‘थँक्स यू’ लिहून त्यांनी भारताला पाठिंबा दर्शविला आहे.

- Advertisement -

परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी पहाटे एअर इंडियाच्या विमानाने मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन कोरोना लसीचे डोस तीन देशांना पाठविले गेले आहेत. ज्यामध्ये मॉरिशसमध्ये एक लाख, म्यानमारला दीड लाख आणि सेशल्सला ५० हजार लस डोस पाठविण्यात आले आहेत. याआधी भारताने कोरोना लसीची पहिली खेप भेटवस्तू म्हणून शेजारील देश भूतान, मालदीव, बांगलादेश आणि नेपाळला भेट म्हणून पाठविली आहे. ज्यामध्ये बांगलादेशला कोविडशील्ड लस २० लाख, नेपाळला १० लाख, भूतानला १.५ लाख, मालदीवला एक लाख डोस देण्यात आले आहेत.

- Advertisement -

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -