घरक्रीडाकोहलीच्या नेतृत्वावर गौतम गंभीरची टीका

कोहलीच्या नेतृत्वावर गौतम गंभीरची टीका

Subscribe

आठ वर्षात एकही ट्रॉफी नाही

भारतीय संघाने अजिंक्यच्या कर्णधारपदाखाली ऑस्ट्रेलियातील सामना जिंकला आहे. पंरतु भारतात होणाऱ्या इंग्लंडविरुद्ध भारत सामन्यांसाठी पुन्हा कर्णधारपदाची धुरा विराट कोहलीकडे सोपवण्यात आली आहे. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांमध्ये वाद आणि संताप व्यक्त होत आहे. यावर भारताचा माजी सलामीवीर आणि भाजप खासदार गौतम गंभीरने विराटवर चांगलीच बोचरी टीका केली आहे. भारताच्या कसोटीची कर्णधार पदाची धुरा ही असे क्रिकेट चाहत्यांचे म्हणणे आहे. परंतु बीसीसीआयने विराट कोहलीला कर्णधार म्हणून नियुक्त केले आहे. यावर कोहलीच्या नेतृत्वार गौतम गंभीरने भाष्य करत कोहलीवर टीका केली आहे.

गौतम गंभीरने एका मुलाखतीत असे म्हटले आहे की, मागील ८ वर्षांपासून आरसीबी संघाचे नेतृत्व विराट कोहली करत आहे. परंतु ८ वर्षांच्या कालावधीत आरसीबीने एकदाही आयपीएल जिंकली नाही. त्यामुळे याचा जबाबदारी विराट कोहलीने स्विकारली पाहिजे. आठ वर्षांचा काळ हा फार मोठा असतो. असा कोणताही कर्णधार नाही ज्याने ८ वर्षांत विजेतेपद मिळवले नाही. असे गौतम गंभीरने म्हटले आहे.

- Advertisement -

जर ८ वर्षांत संघाला विजेतेपद पटकवता आले नाही. तर ते संघाचे अपयश नसून कर्णधाराचे अपयश आहे. त्यामुळे मला वाटते की, कोहलीने याबाबत जबाबदारी स्वीकारली पाहिजे. आणि या हा अपयशाला मी जबाबदार आहे असे म्हणायला पाहिजे, कोहलीने या पराभवाचा आणि काही गोष्टींचा स्वीकार करायला हवा असेही गौतम गंभीरने म्हटले आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -