घरदेश-विदेशCovid-19 Vaccine: ...म्हणून ब्राझीलने Covaxin ची डील केली सस्पेंड; ३२ कोटी डॉलरचा...

Covid-19 Vaccine: …म्हणून ब्राझीलने Covaxin ची डील केली सस्पेंड; ३२ कोटी डॉलरचा होता करार

Subscribe

ब्राझील या देशाने कोव्हॅक्सिन लसीचा भारत बायोटेकशी केलेला करार स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ब्राझीलमध्ये या करारावर बरेच प्रश्न उपस्थित केले जात होते, त्यानंतर आता ३२ कोटी डॉलर्सचा हा करार निलंबित करण्यात आला असल्याचे सांगितले जात आहे. मंगळवारी ब्राझीलचे आरोग्यमंत्री मार्सेलो यांनी याची घोषणा केली. या करारानुसार ब्राझीलला भारत बायोटेक कडून एकूण २ कोटी लस डोस खरेदी करायचे होते. परंतु ब्राझीलमधील कराराबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले आणि राष्ट्रपती जायर बोल्सोनेरो यांच्यावर भ्रष्टाचार लपविण्याचा आरोप करण्यात आला होता.

ब्राझील सरकार सतत व्हिस्लॉब्लर्स कडून घेरले होते, सरकारने स्पष्टीकरणही दिले मात्रा त्याचा काही फरक पडला नाही. आता जेव्हा हे प्रकरण ब्राझीलच्या सर्वोच्च न्यायालयात पोहोचले तेव्हा ब्राझील सरकारने हा करार रद्द करण्याचा निर्णय घेतला. या प्रकारानंतर ब्राझीलच्या माध्यमांच्या वृत्तानुसार, या प्रकरणाची चौकशी पूर्ण होईपर्यंत कोव्हॅक्सिन लसीचा केलेला करार निलंबित राहणार, असल्याचे सांगितले जात आहे. यासह, ब्राझीलच्या आरोग्य मंत्रालयाकडून वारंवार दावा केला जात आहे की या करारात कोणताही गैरप्रकार झालेला नाही.

- Advertisement -

असे केले जात होते आरोप

या कराराबद्दल ब्राझीलच्या आरोग्य मंत्रालयाच्या अधिकाऱ्यावर भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन खरेदी करण्यासाठी दबाव आणल्याचा आरोप करण्यात आला होता. राष्ट्रपती जायर यांना याची माहिती होती, परंतु असे असूनही त्यांनी हा करार थांबवला नाही आणि ब्राझीलला महागड्या कोव्हॅक्सिनची खरेदी करावी लागली. ब्राझीलमध्ये या करारासंदर्भात गोंधळाची चर्चा सुरू झाली तेव्हापासून राष्ट्रपती जायर सर्वांच्या निशाण्यावर होते. संसदीय समितीही कोरोनाच्या व्यवस्थापनाविषयी चौकशी करीत आहे. या चौकशीदरम्यान हे प्रकरण समोर आल्याचे सांगितले जात आहे. ब्राझीलकडे फायझरची लस विकत घेण्याचा पर्याय होता, तरी देखील भारत बायोटेककडून त्यांनी एक महाग लस विकत घेतली, जर चुकीचे आरोप सिद्ध झाले तर राष्ट्राध्यक्ष जायर यांचे पद अडचणीत येऊ शकते.


‘Covaxin’ अल्फा आणि डेल्टा व्हेरियंटवर सर्वाधिक प्रभावी, अमेरिकच्या आरोग्य संघटनेचा दावा

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -