घरदेश-विदेशबीटेक विद्यार्थीनीचे अपहरण करुन सामुहिक बलात्कार

बीटेक विद्यार्थीनीचे अपहरण करुन सामुहिक बलात्कार

Subscribe

अभियांत्रींकी विद्यार्थीनीचे अपहरण करुन सामुहिक बलात्कार केल्याची घटना आग्रा येथे घडली आहे. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून इतर दोघांचा तपास सुरु करण्यात आला आहे.

अभियांत्रीक विभागात शिकत असलेल्या विद्यार्थीनीवर सामुहिक बलात्काराची घटना घडली आहे. आग्रा येथे ही घटना घडली असून या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. या मुलीचे अपहरण करुन शहरी भागापासून ग्रामिण भागात नेण्यात आले होते. येथे या नराधमांनी तिच्यावर बलात्कार केला. या प्रकरणी आरोपींविरोधात पोलिसांनी ३७६ ड (बलात्कार) कलमाअंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. दरम्यान या पीडित मुलीची वैद्यकीय तपासणी करणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

घरी परतत असताना केले अपहरण

पीडितेच्या वडिलांनी केलेल्या तक्रारी नुसार पीडित मुलगी क्लासहून घरी परतत होती. त्यावेळी दूचाकीवरुन आलेल्या दोघांनी तिचे अपहरण केले. तिला दूचाकीवर जबरदस्ती बसवले. या मुलीला पोयिया घाट परिसरात जबरदस्ती नेण्यात आले. त्या ठिकाणी इतर दोन आरोपी अगोदरच उपस्थित होते. या चौघांनी या पीडितेवर सामुहिक बलात्कार केला. या परिसरात पोलिसांनी गश्त सुरु असतानाच ही पीडित मुलगी जखमी अवस्थेत पोलिसांना आढळली. या मुलीला स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. पीडित मुलीवर अजूनही रुग्णालयात सुरु आहे.

- Advertisement -

“या प्रकरणी राहुल निशाद (२३) आणि कन्हैया लाल (१९) या दोघांना अटक करण्यात आली आहे. सध्या या दोघांची चौकशी पोलीस करत आहेत. इतर दोघांचा शोध पोलिसांनी सुरु केला आहे. ” – अमित पाठक, आगरा वरिष्ठ पोलीस अधीक्षक (एसएशपी)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -