घरदेश-विदेशCOVAXIN लस घेतलेल्या व्यक्तींना करता येणार परदेश प्रवास?, वाचा सविस्तर

COVAXIN लस घेतलेल्या व्यक्तींना करता येणार परदेश प्रवास?, वाचा सविस्तर

Subscribe

कोरोना महामारीच्या काळात लोकांना एका देशातून दूसऱ्या देशात येण्या-जाण्यासाठी देशात लसीकरणाचा आधार बनविण्यासाठी चर्चा सुरू आहे. WHO म्हणजेच जागतिक आरोग्य संघटना कोरोना लसीकरणाची यादी तयार करत आहे, त्यानंतर लोक एका देशातून दुसर्‍या देशात जाऊ शकतील. केंद्र सरकारने म्हटले की, जागतिक आरोग्य संघटनेमध्ये या विषयावर चर्चा देखील सुरू आहे, परंतु अंतिम निर्णय घेण्यात आलेला नाही, असे सांगितले जात आहे.

“आत्तापर्यंत असणारी मार्गदर्शक तत्वे केवळ कोरोना चाचणीसाठी आहेत. म्हणजेच यापूर्वी प्रवास करायचा असेल तर कोरोना चाचणी निगेटिव्ह असणं बंधनकारक आहे. मात्र लस घेतलेल्या व्यक्तींना परदेश प्रवास करता येणार की नाही, यासंदर्भात डब्ल्यूएचओमध्ये अद्याप कोणतेही एकमत झाले नाही, तरीही चर्चा अद्याप सुरू आहे.”, असे आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव्ह अग्रवाल यांनी सांगितले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, डब्ल्यूएचओ Emergency Use Listing (EUL) मध्ये समाविष्ट असलेल्या लशींची यादी तयार करत आहे. ज्या लसींचा या यादीमध्ये समावेश करण्यात येईल, त्या लसी घेतलेल्या व्यक्तींना इतर देशात जाण्यास परवानगी मिळणार आहे. आणि त्या व्यक्तींना पुन्हा कोरोना चाचणी करण्याची आवश्यकता देखील भासणार नाही.

- Advertisement -

डीडब्ल्यूएचओने आतापर्यंत तयार केलेल्या यादीत, अ‍ॅस्ट्रॅजेनेका या लशीचे नाव आहे मात्र कोव्हॅक्सिन या लसीचे नाव नाही. अ‍ॅस्ट्रॅजेनेकाची लस सीरम इन्स्टिट्यूट कोव्हिशील्ड या नावाने भारतात बनवली जात आहे. कोव्हॅक्सिनचे नावही अंतिम यादीमध्ये समाविष्ट करण्यात आलेले नाही, त्यामुळे भारतातील कोट्यवधी लोकांच्या परदेशी प्रवासावर अद्याप प्रश्नचिन्ह उपस्थितीत केले जात आहे.

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -