घरताज्या घडामोडीCorona update: दिलासादायक! देशात बाधितांच्या संख्येत घट; गेल्या २४ तासात २,४०,८४२ नव्या...

Corona update: दिलासादायक! देशात बाधितांच्या संख्येत घट; गेल्या २४ तासात २,४०,८४२ नव्या रूग्णांची नोंद

Subscribe

कोरोनाच्या वाढत्या प्रादु्र्भावादरम्यान, देशात कोरोनाबाधितांच्या संख्येत काहीशी घट पाहायला मिळत आहे. देशात शनिवारी करण्यात आलेल्या कोरोना बाधितांच्या संख्येशी तुलना करता गेल्या २४ तासात कोरोना बाधितांचा आकडा घटला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात २४ तासांत २ लाख ४० हजारांहून अधिक नवे कोरोना रूग्ण आढळले असून एका दिवसात ३ हजार ७४१ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर ३ लाख ५५ हजार १०२ जण कोरोनामुक्त झाले असून त्यांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

दिवसभरात २,४०,८४२ नवे रूग्ण आढळल्याने भारतातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा २ कोटी ६५ लाख ३० हजार १३२ झाला आहे. देशात २ कोटी ३४ लाख २५ हजार ४६७ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत २ लाख ९९ हजार २६६ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. देशात सध्या २८ लाख ५ हजार ३९९ इतके सक्रिय रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे. यासह आतापर्यंत कोरोना लसीकरण झालेल्या देशातील नागरिकांची संख्या १९ कोटी ५० लाख ४ हजार १८४ इतकी असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

- Advertisement -

 

- Advertisement -

आयसीएमआरने दिलेल्या माहितीनुसार, २२ मेपर्यंत देशात ३२ कोटी ८६ लाख ७ हजार ९३७ नमुन्यांच्या चाचण्या झाल्या आहेत. त्यापैकी काल दिवसभरात २१ लाख २३ हजार ७८२ नमुन्यांच्या चाचण्या झाल्या आहेत.

दरम्यान, राज्यात गेल्या २४ तासांत २६ हजार १३३ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ६८२ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ५५ लाख ५३ हजार २२५वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत ८७ हजार ३०० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यात ३ लाख ५२ हजार २४७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. शनिवारी दिवसभरात ४० हजार २९४ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आजपर्यंत एकूण ५१ लाख ११ हजार ९५ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -