घरमनोरंजनरुग्णालयाच्या निष्काळजीपणाने वडिलांचे निधन,संभावना सेठचा गंभीर आरोप!

रुग्णालयाच्या निष्काळजीपणाने वडिलांचे निधन,संभावना सेठचा गंभीर आरोप!

Subscribe

संभावना सेठच्या वडिलांचा 8 मे रोजी कोरोनामुळे मृत्यू झाला परंतु वडिलांच्या मृत्यूनंतर 13 दिवसांनी रुग्णालयात गोंधळ घातल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. आणि हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय.

जगभरामध्ये कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. कोरोनाबधितांचा आकडा दिवसागणिक लाखोंच्या घरात पोहचत आहे.आपुर्‍या सोयी सुविधे अभावी अनेक कोरोनाबाधित रुग्ण दगावत आहेत. अशातच आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण येत आहे. डॉक्टर,नर्स अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी जिवाची पर्वा न करता दिवसरात्र काम करत आहेत. अशी परिस्थिती असताना रुग्णालयाच्या बेजबाबदारीपणामुळे तसेच निष्काळजीपणामुळे वडिलांचा मृत्यू झाल्याचा आरोप अभिनेत्री संभावना सेठ हिने केला आहे. संभावना सेठच्या वडिलांचा 8 मे रोजी कोरोनामुळे मृत्यू झाला परंतु वडिलांच्या मृत्यूनंतर 13 दिवसांनी रुग्णालयात गोंधळ घातल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. आणि हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. भिनेत्री संभावना सेठ हिने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंट वर भली मोठी पोस्ट करून आपला राग व्यक्त करत घडलेल्या घटनेची माहिती दिली आहे. रुग्णालयाच्या निष्काळजीपणामुळे माझ्या वडिलांचा मृत्यू झाला असल्याचे गंभीर आरोप केले आहे.

- Advertisement -

तसेच उपचारादरम्यान संभावना सेठ रुग्णालयातल्या कर्मचा-यांना जाब विचारताना दिसत आहे. यावर कोणीही तिला समाधानकारक उत्तर देताना दिसत नाहीये. डॉक्टर आणि नर्स कोणीही संभावनाच्या प्रश्नाला उत्तर देत नसल्यामुळे संभावनाचा राग अनावर झाल्याचे व्हिडिओ मध्ये दिसत आहे. 8 मिनीटाच्या या व्हिडीओनंतर संभावनाने लिहले की, या सर्व गोंधळानंतर दोन तासानंतर मृत्यू झाला. माझ्या वडिलांचा मृत्यू कोरोनाने नाही तर रुग्णालयाच्या निष्काळजीपणामुळे झाला आहे. ज्याची किंमत रुग्णालयाला चुकवावी लागणार आहे. माझे वकिल रुग्णालयाला लवकरच लिगल नोटीस पाठवणार असल्याचे अभिनेत्री संभावना सेठ हिने म्हंटले आहे.


हे हि वाचा – श्रेया घोषालच्या घरी झाले नव्या पाहुण्याचे आगमन,श्रेयाने दिला गोंडस मुलाला जन्म

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -