घरदेश-विदेशकॅनडाच्या टोरंटोमध्ये महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना; भारतीय दूतावासाकडून नाराजी

कॅनडाच्या टोरंटोमध्ये महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना; भारतीय दूतावासाकडून नाराजी

Subscribe

यॉर्क स्थानिक पोलिसांच्या माहितीनुसार, योंगे स्ट्रीट आणि गार्डन अव्हेन्यू भागातील विष्णू मंदिरातील महात्मा गांधींचा पाच मीटर उंच पुतळ्याची तोडफोड करण्यात आल्याची घटना समोर आली आहे

कॅनडाची राजधानी टोरंटोमध्ये राष्ट्रपती महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची विटंबना केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना टोरंटोमधील रिचमंड हिल येथील एका हिंदू मंदिरातील आहे. याठिकाणी महात्मा गांधींचा एक मोठा पुतळा बसवण्यात आला होता, मात्र काही अज्ञातांनी पुतळ्यांची विटंबना केली आहे. या प्रकरणाची पोलिसांत तक्रार करण्यात आली असून घटनेचा तपास सुरु आहे. काल दुपारी साडे बारा वाजण्याच्या सुमारास घडली आहे.

कॅनडातील टोरंटो येथील भारतीय वाणिज्य दूतावासानेही ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे. वाणिज्य दूतावासाने ट्विट केले की, रिचमंड हिल येथील विष्णू मंदिरातील महात्मा गांधींचा पुतळा पाडल्यामुळे आम्हाला फार दु:ख होत आहे. तोडफोडीच्या या गुन्हेगारी, घृणास्पद कृत्याने कॅनडामधील भारतीय समुदायाच्या भावना दुखावल्या आहेत.

- Advertisement -

यॉर्क स्थानिक पोलिसांच्या माहितीनुसार, योंगे स्ट्रीट आणि गार्डन अव्हेन्यू भागातील विष्णू मंदिरातील महात्मा गांधींचा पाच मीटर उंच पुतळ्याची तोडफोड करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. तसेच पुतळ्यावर काही आक्षेपार्ह शब्दही लिहिण्यात आल्याचे सांगण्यात येतेय. ही घटना द्वेषपूर्ण भावनेने प्रेरित असल्याचे मानले जात आहे.
या द्वेषपूर्ण गुन्ह्याचा तपास करण्यासाठी आम्ही कॅनडाच्या अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहोत.

- Advertisement -

दरम्यान हा असा प्रकार खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा कॅनडा पोलीस अधिकाऱ्याने दिला आहे. तसेच याप्रकरणातील दोषींना पकडून त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल, अशी माहितीही त्यांनी दिली आहे.


पुण्यात ट्रेकिंगला जाताय? गड-किल्ल्यांवर जमावबंदी लागू, जिल्ह्याधिकाऱ्यांकडून नियमावली सादर


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -