घरदेश-विदेशसीडीएस बिपीन रावत, मधुलिका रावत यांच्यासह या अधिकाऱ्यांचं हेलिकॉप्टर दुर्घटनेत निधन

सीडीएस बिपीन रावत, मधुलिका रावत यांच्यासह या अधिकाऱ्यांचं हेलिकॉप्टर दुर्घटनेत निधन

Subscribe

देशाच्या तिन्ही सैन्यदलांचे प्रमुख अर्थात चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपिन रावत यांचं तामिळनाडूमध्ये झालेल्या हेलिकॉप्टर दुर्घटनेमध्ये निधन झाले. या दुर्घटनेत बिपीन रावत यांच्या पत्नी मधुलिका रावत यांचा देखील मृत्यू झाला. यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दुर्घटनेत आपले प्राण गमावले आहेत. भारतीय वायुसेनेचे ग्रुप कॅप्टन वरुण सिंह हे या दुर्घटनेत जखमी झाले आहेत. त्यांच्यावर सध्या सैनिकी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

हेलिकॉप्टर दुर्घटनेत चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपिन रावत, मधुलिका रावत, ब्रिगेडियर एल. एस. लिड्डर, लेफ्टनंट कर्नल हरजिंदर सिंग, नायक गुरुसेवक सिंग, नायक जितेंद्र कुमार, लान्स नायक विवेक कुमार, लान्स नायक साई तेजा, हवालदार सत्पाल, ग्रुप कॅप्टन पी. एस. चौहान आणि स्क्वॉड्रन लीडर कुलदीप यांचा मृत्यू झाला आहे.

- Advertisement -

अपघातामधून एकमेव अधिकारी बचावले

हेलिकॉप्टर दुर्घटनेत एकमेव अधिकारी बचावले आहेत. भारतीय वायुसेनेचे ग्रुप कॅप्टन वरुण सिंह हे या दुर्घटनेत जखमी झाले आहेत. त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती मिळत आहे. वरुण सिंह यांनी २०२० मध्ये एका मोठ्या संकटातून तेजस लढाऊ विमानाला वाचवले होते. त्यांच्या या धाडसामुळेच त्यांना या वर्षीच्या स्वातंत्र्यदिनी शौर्य चक्राने सन्मानित करण्यात आले आहे.

घटनाक्रम

सकाळी ९ वाजता : सीडीएस जनरल बिपीन रावत, पत्नी मधुलिका आणि इतर वरिष्ठ कर्मचारी एका विशेष विमानाने दिल्लीहून निघाले.

- Advertisement -

सकाळी ११.३५ वाजता : दिल्लीहून उड्डाण करणारे विशेष विमान तामिळनाडूच्या कोईम्बतूर येथील सुलूर आयएएफ स्टेशनवर उतरले.

सकाळी ११.४५ वाजता : सीडीएस जनरल बिपीन रावत आणि त्यांची पत्नी मधुलिका रावत यांच्यासह चौदाजण भारतीय हवाई दल (IAF) Mi-17V5 हेलिकॉप्टरमध्ये बसले. हेलिकॉप्टरने वेलिंग्टनमधील डिफेन्स स्टाफ कॉलेजसाठी उड्डाण केले जेथे जनरल रावत एका कार्यक्रमात सहभागी होणार होते.

दुपारी १२.२० वाजता : कुन्नूरजवळील कटेरी-नांचप्पंचथरम भागात आयएएफचे हेलिकॉप्टर क्रॅश झाल्याची पहिली बातमी समोर आली आहे.

दुपारी १२.२५ वाजता : स्थानिकांनी अपघातस्थळी धाव घेतली आणि जिल्हा पोलीस आणि अधिकाऱ्यांना सतर्क केले. शोध आणि बचाव कार्य सुरू करण्यात आले.

दुपारी १.५३ वाजता : आयएएफने एका ट्विटमध्ये माहिती दिली की कुन्नूरजवळ क्रॅश झालेल्या IAF Mi-17V5 हेलिकॉप्टरमध्ये सीडीएस जनरल बिपिन रावत होते. अपघाताचे कारण शोधण्यासाठी चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत, असे आयएएफने म्हटले आहे.

दुपारी ०६.०३ वाजता : ट्विटरवरील एका थ्रेडमध्ये, आयएएफने माहिती दिली की सीडीएस जनरल बिपिन रावत आणि त्यांच्या पत्नीसह हेलिकॉप्टरमधील १४ पैकी १३ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे.


हेही वाचा – CDS Bipin Rawat Death: बिपीन रावत यांचं निधन, मोदी-राहुल गांधींसह अनेकांकडून शोक व्यक्त


 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -