घरताज्या घडामोडीCDS Bipin Rawat Death: बिपीन रावत यांच्या निधनावर पाकिस्तान लष्काराचे ट्वीट

CDS Bipin Rawat Death: बिपीन रावत यांच्या निधनावर पाकिस्तान लष्काराचे ट्वीट

Subscribe

पाकिस्तानी लष्कराने सीडीएस बिपीन रावत यांच्या हेलिकॉप्टर दुर्घटनेतील मृत्यूवर (CDS Bipin Rawat Death) दुःख जाहीर केले आहे. तामिळनाडूतील कुन्नूरमध्ये बुधवारी झालेल्या हेलिकॉप्टर दुर्घटनेमध्ये सीडीएस रावत आणि त्यांच्या पत्नीसह १३ जणांचा मृत्यू झाला आहे. या दुःखद बातमीनंतर संपूर्ण देशभरात शोक पसरला आहे. एवढेच नाहीतर पाकिस्तानातील लोकं सीडीएस बिपीन रावत आणि या दुर्घटनेतील मृत्यूवर झालेल्यांबाबत संवदेना जाहीर करत आहेत.

पाकिस्तानी लष्कराने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर ट्वीट केले आहे. ज्यात लिहिले आहे की, ‘जनरल नदीप रझा, जनरल कमर जावेद बाजवा आणि सीओएएस (चीफ ऑफ द आर्मी स्टाफ) भारतात झालेल्या हेलिक्रॉप्टर क्रशमध्ये सीडीएस जनरल बिपीन रावत, त्याची पत्नी आणि इतर लोकांना दुर्दैवी मृत्यूवर शोक व्यक्त करतात.’

- Advertisement -

दरम्यान पाकिस्तानी लष्कराच्या या ट्वीट नंतर लोकं पाकिस्तानचे कौतुक करत आहेत. इब्राहिम हनीफ नावाच्या युजरने लिहिले आहे की, ‘मानवता सर्वात पहिल्यांदा येते आणि पाकिस्तानी लष्कराने प्रोफेशनलिजम दाखवले आहे. आम्ही द्वेषावर विश्वास करत नाही.’

- Advertisement -

पाकिस्तानमधील बरेच लोकं सीडीएस बिपीन राव यांच्या मृत्यूवर दुःख जाहीर करत आहेत. एम नोमान नावाच्या युजरने लिहिले आहे की, ‘सीडीएस बिपीन रावत यांच्या मृत्यूची बातमी ऐकून शॉकमध्ये आहे. या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांप्रती माझ्या संवेदना.’


हेही वाचा – CDS- बिपीन रावत होते ‘सर्जिकल स्ट्राईक’चे सूत्रधार ,पाकिस्तान, चीनची उडवली झोप


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -