घरदेश-विदेशकेरळला केंद्राकडून ५०० कोटींची मदत जाहीर

केरळला केंद्राकडून ५०० कोटींची मदत जाहीर

Subscribe

केंद्र सरकारने केरळसाठी ५०० कोटींची मदत जाहीर केली आहे. पंतपप्रधान नरेंद्र मोदी यांनी केरळच्या पुरस्थितीचा आढावा घेतल्यानंतर ही घोषणा करण्यात आली आहे.

देवभूमि केरळमध्ये सध्या पावसाने हाहाकार उडवून दिला आहे. शेकडोंच्या संख्येनं लोकांना आपले जीव गमवावे लागले आहेत. तर हजारोंच्या संख्येनं लोक पुराच्या पाण्यात अडकून पडले आहेत. ३ लाख १० हजारापेक्षा जास्त लोकांना २००० रिलीफ कॅंम्पमध्ये हलवण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सकाळी केरळच्या पूरस्थितीचा आढावा घेण्यासाठी हवाई पाहणी दौरा केला. यानंतर त्यांनी केरळच्या मुख्यमंत्र्यांची भेट घेत ५०० कोटींच्या मदतीची घोषणा केली. यानंतर बोलताना पंतप्रधानांनी केरळमधील परिस्थिती अत्यंत गंभीर असून केंद्र सरकार सर्वतोपरी मदत करेल असे आश्वासन दिले आहे. दरम्यान, केरळमध्ये सुरू असलेल्या पावसामुळे रस्ता, रेल्वे आणि हवाई वाहतुकीवर देखील परिणाम झाला आहे. लष्कर, नेव्ही, एअरफोर्स आणि NDRF सध्या प्राणांची बाजी लावून मदत कार्य करत आहे.

केरळच्या १४ जिल्ह्यांमध्ये पावसाचा हाहाकार

केरळमध्ये पावसाने रौद्ररुप धारण केले आहे. केरळच्या १४ जिल्ह्यांमध्ये पावसाने हाहाकार उडाला आहे. तर मुन्नर, वायनाड, कोझिकोडे, पलक्कड, एर्नाकुलम, थ्रिसूर या भागांची सर्वाधिक वाईट परिस्थिती झाली आहे. केरळच्या आंध्रप्रदेशने १० कोटी, तेलंगणा सरकारने २५ कोटी आणि महाराष्ट्र सरकारने ५ कोटींची मदत जाहीर केली आहे. राज्यातील २ लाख नागरिकांना सुरक्षितेसाठी रिलीफ कॅम्पमध्ये हलवण्यात आले आहे. लष्कर, हवाई दल तसेच नौदलाचे बचावकार्य युद्ध पातळीवर सुरु आहे. यासाठी २३ हेलिकॉप्टर आणि २०० बोटी देखील तैनात करण्यात आल्या आहेत. तसेच राज्यातील अनेक खासगी आणि सरकारी रुग्णालयांतील ऑक्सिजनच्या सिलिंडरच्या तुडवड्यामुळे रुग्णसेवेत देखील बाधा येऊ लागली आहे. अनेक घरांमध्ये १५ फूटांपर्यंत पाणी साठल्याने हेलिकॉप्टरद्वारे अन्नपुरवठा केला जात आहे.

- Advertisement -
वाचा – पूरस्थितीच्या पाहणीसाठी पंतप्रधान मोदी केरळच्या दौऱ्यावर

नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली

केरळमधील काही जिल्ह्यात अतिशय भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे. अलाप्पुझा, एर्नाकुलम, पथनमतित्ता आणि त्रिशूर या जिल्ह्यांतील पूरस्थिती अतिशय बिकट झाली आहे. पंपा, पेरियार आणि चालाकुडी नद्यांनी पाणीपातळी ओलांडली असल्याची माहिती मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी दिली आहे. तसेच केरळमधील १०० वर्षांतील हा सर्वात भयानक महापूर असल्याची माहिती मुख्यमंत्री कार्यालयाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन देण्यात आली आहे.

वाचा – केरळात पावसाचे ३२४ बळी

सात राज्यांमध्ये ८६८ जणांचा मृत्यू

या वर्षात झालेल्या पावसाने देशभरात झालेल्या हानीबद्दलचा एक अहवाल केंद्रीय गृहमंत्रालयाच्या राष्ट्रीय आपत्ती निवारण केंद्राने प्रसिद्ध केला आहे. यामध्ये अतिवृष्टी, महापूर आणि भूस्खलन या आपत्तीमुळे देशभरातील सात राज्यांमध्ये यंदाच्या पावसाळ्यात तब्बल ८६८ जणांचा जीव गेल्याचे समोर आले आहे. तर याचा सर्वात जास्त फटका केरळला बसला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -